Marathi Movie: मराठी चित्रपटात पहिल्यांदा स्विमसूट परिधान करणाऱ्या अभिनेत्री कोण होत्या?

Meenakshi Shirokar: आज मराठी सिनेमा हा त्याच्या आशयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटसृष्टीनं आज जगात आपलं नावं कमावलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांत एक वेगळा इतिहास रचला आहे. नव्या पद्धतीचं दिग्दर्शन, नवे विचार, नवी शैली आणि नवं लिखाण तसेच गोष्ट घेऊन परिपुर्ण आशयासह मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे

Updated: Jan 25, 2023, 09:43 PM IST
Marathi Movie: मराठी चित्रपटात पहिल्यांदा स्विमसूट परिधान करणाऱ्या अभिनेत्री कोण होत्या? title=

Meenakshi Shirokar: आज मराठी सिनेमा हा त्याच्या आशयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटसृष्टीनं आज जगात आपलं नावं कमावलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांत एक वेगळा इतिहास रचला आहे. नव्या पद्धतीचं दिग्दर्शन, नवे विचार, नवी शैली आणि नवं लिखाण तसेच गोष्ट घेऊन परिपुर्ण आशयासह मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. आज मराठी चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्सही (Bold Scenes in marathi industry) सहज पाहायला मिळतात. बिकीनी लुकही आता फारच कॅज्यूअल झालेला पाहायला मिळतो. इन्टाग्रामवर असे लुक्सही अनेकदा व्हायरल होताना आपण पाहतो परंतु 1938 मध्ये म्हणजे जवळपास 85 वर्षांपुर्वी एका दिग्गज अभिनेत्रीनं चित्रपटातून ऑनस्क्रिन स्विमसूट लूक परिधान केला होता. (veteran marathi actress meenakshi shirodkar was the 1st lady to wear swimsuit in the film called brahmachari)

काळाच्या पुढे असणाऱ्या या अभिनेत्रीचे नावं होतं मिनाक्षी शिरोडकर. 'ब्रम्हचारी' (Brahmachari) या 1938 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात 'यमुना जळी खेळू खेळ... ' या गाण्यातून मिनाक्षी यांनी स्विमसूट परिधान केला होता. या चित्रपटाची आजही चर्चा होते. त्या काळी हा चित्रपट खूप गाजला होता. त्यावेळी या चित्रपटाच्या कथेमुळे आणि गाण्यांमुळेही हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील या सीनमुळे तेव्हा मराठी प्रेक्षकांमध्येही चर्चा सुरू झाली होती परंतु मिनाक्षी यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही केले गेले होते. 

 'ब्रम्हचारी' हा चित्रपट कृष्णधवल चित्रपट होता. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक मास्टर विनायक (Master Vinayak) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला होता. मिनाक्षी यांनी 'ब्रम्हचारी' चित्रपटासोबतच 'रामशास्त्री', 'देवता', 'झूला', 'जवानी', 'संगम', 'बडी मॉं' यांसारख्या हीट चित्रपटातून महत्त्वाच्या भुमिका केल्या. 

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांच्या आजी मीनाक्षी शिरोडकर होत्या. नम्रता आणि शिल्पा शिरोडकर यांनी 90 च्या दशकात अनेक हीट चित्रपटांमधून कामं केली आहेत. नम्रता शिरोडकर यांनी साऊथचे विख्यात निर्माते आणि अभिनेते महेश बाबू (Mahesh Babu) यांच्याशी लग्न केले आहे. 

मिनाक्षी शिरोडकर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 साली झाला. 3 जून 1997 साली वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आवर्जून घेतले जाते.