राहुल महाजनचं तिसरं लग्न, आधीची बायको डिम्पी म्हणते....

 राहुलची आधीची बायको डिम्पी गांगुली (Dimpy Ganguly) सध्या फ्रांसमध्ये असून ती आपला पती आणि मुलीसोबत आनंदात आहे. 

Updated: Nov 24, 2018, 11:51 AM IST
राहुल महाजनचं तिसरं लग्न, आधीची बायको डिम्पी म्हणते....

मुंबई : राहुल महाजनने 20 नोव्हेंबर 2018 ला मुंबईतील मलबार हिलमधील एका मंदिरात नताल्या इलीना (Natalya Ilina) सोबत लग्न केलंय. राहुल आणि नताल्या यांच्या वयामध्ये साधारण 18 वर्षांचं अंतर आहे. राहुलचं वय 43 वर्षे तर नताल्याचं केवळ 25 वर्षांची आहे. आता राहुल महाजनची एक्स वाईफने या संदर्भात आपली प्रतिक्रीय आलीयं. राहुलची आधीची बायको डिम्पी गांगुली (Dimpy Ganguly) सध्या फ्रांसमध्ये असून ती आपला पती आणि मुलीसोबत आनंदात आहे. जेव्हा डिम्पीला राहुलसोबतच्या लग्नाबद्दल विचारल्यावर तिला हसू आवरलं नाही. स्पॉटबॉय डॉट कॉमने यासंदर्भात वृत्त दिलंय.

Image result for rahul mahajan new wife zee

'तिला सहन कराव लागू नये'

'मला हे ऐकून आनंद झाल्याचे डिम्पी म्हणते. यावेळेस राहुलला खरंच आनंद मिळो. दोघांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा..' असं डिम्पी म्हणाली. डिम्पी याबद्दल पुढे म्हणते, 'मी जे सहन केलं ते नताल्याला सहन करावं लागू नये. वेळेनुसार माणसं बदलतात. मला फक्त एवढंच वाटतं की ते सर्व पुन्हा होऊ नये.'

Image result for rahul mahajan new wife zee

आमच्यात चांगली समज 

'मी आधीची दोन लग्न धुमधडाक्यात केली पण ती जास्त काळ टिकली नाहीत. मी साधारण वर्षभरापासून नताल्याला ओळखतो.

आमच्या दोघांमध्ये चांगली समज आहे. तिला एका नव्या व्यवसायाला सुरूवात करायची आहे आणि मी तिला यामध्ये मदत करेन' असं राहुलने म्हटलंय.

3 वर्षांच नातं

Image result for rahul mahajan new wife zee

राहुल आणि डिम्पीने 2010 साली लग्न केलं होतं. 'राहुल का स्वयंवर' नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये दोघांच लग्न ठरलं.

Image result for rahul mahajan new wife zee

लग्नाच्या काही काळानंतर डिम्पीने राहुलवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. त्यानंतर 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये डिम्पीने रोहित रॉयशी लग्न केलं.