'लाफ्टर शेफ्स' च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यसोबत घडली धक्कादायक घटना, आगीनं घेतला पेट आणि...

Rahul Vaidya Accident with Fire : राहुल वैद्यसोबत 'लाफ्टर शेफ्स' च्या सेटवर घडली धक्कादायक घटना... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 22, 2024, 11:18 AM IST
'लाफ्टर शेफ्स' च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यसोबत घडली धक्कादायक घटना, आगीनं घेतला पेट आणि... title=
(Photo Credit : Social Media)

Rahul Vaidya Accident with Fire : छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शो 'लाफ्टर शेफ्स' सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना कॉमेडी आणि ड्रामा खूप पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे या शोमध्ये असलेली कलाकारांची मोठी टीम आहे. पण या सगळ्यात कुकिंग शोला घेऊन बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रीम शेखसोबत एक मोठी घटना घडली होती. तर आता गायक राहुल वैद्यसोबत अशीच काहीशी घटना झाली आहे. राहुल वैद्य जेवण बनवत असताना आगीनं अचानक पेट घेतला. 

हा व्हिडीओ कलर्सच्या अधिकृत ट्वीटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या शोचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. शोमध्ये असलेले कलाकार हे सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. या सगळ्यात आता राहुल वैद्यचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. खरंतर रीम शेखसोबत या शोच्या सेटवर मोठी घटना घडली होती आणि आता लगेच राहुल वैद्यसोबत घटना घडली आहे. राहुल त्याचा पार्टनर अली गोनीसोबत जेवण बनवत असताना अचानक आगीचा भडका उठला आणि राहुलच्या दिशेनं ही आग गेली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे स्पर्धक हे घाबरल्याचे पाहायला मिळते इतकंच नाही तर ते सतत किंचाळताना दिसले. सगळ्यात आधी निया शर्मा आणि जन्नत जुबेर यांचं देखील या सगळ्यात जेवण खराब झालं. हा व्हिडीओ खरंच भयानक आहे. सध्या राहुल हा ठीक आहे, त्याला गंभीर जखम झालेली नाही. 

राहुल वैद्य आधी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रीम शेखसोबत याच शोमध्ये ही घटना घडली होती. मात्र, एकीकडे राहुल वाचला तर दुसरीकडे रीम शेखला चेहऱ्यावर जखम झाली. रीम जेवणं बनव असताना तिच्या चेहऱ्यावर गरम-गरम तेलांचे थेंब उडाले. रीमच्या चेहऱ्यावर आता डाग राहिले आहेत. 

हेही वाचा : 'तुम्ही प्रेमाची खिल्ली उडवली, आता हे सगळं पाहून...'; अंकिता-विकीचा रोमांस पाहून नेटकरी संतप्त!

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. राहुलचे चाहते त्याला यापुढे काळजी घे असं सांगत आहेत. इतकंच नाही तर त्याला काही दुखापत झाली की नाही असा सवाल देखील अनेकांनी त्याला विचारला आहे.