लग्नमंडपात पुन्हा राहुलने दिली प्रेमाची कबुली, दिशा ही झाली सरप्राईज

लग्नमंडपात वरमाला घालण्याआधी राहुलने दिशाच्या हातात रिंग घातली. त्यानंतर दोघांनी पुन्हा एकमेकांना मिठी मारली.

Updated: Jul 16, 2021, 04:44 PM IST
लग्नमंडपात पुन्हा राहुलने दिली प्रेमाची कबुली, दिशा ही झाली सरप्राईज  title=

मुंबई : बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि दिशा परमार अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.  सात फेरे घेत दोघांनी एकमेकांना सात ही जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलं आहे. या जोडीच्या लग्नातील खास क्षण समोर आले आहेत. 
काही मोजक्या लोकांच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पडला आहे. दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यावेळी लग्नमंडपात दिसून आले. सध्या सोशल मीडियावर या नवविवाहीत जोडप्याचीच चर्चा रंगली आहे.  दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Stories (@bollywoodstoriesupdates)

 

 

लग्नमंडपात वरमाला घालण्याआधी राहुलने दिशाच्या हातात रिंग घातली. त्यानंतर दोघांनी पुन्हा एकमेकांना मिठी मारली. वेडिंग लूकबद्दल सांगायचं झालं तर,  राहुलने गोल्डन कलरची शेरवानी आणि दिशाने रेड कलरचा डिझाईनर लेहंगा  परिधान केला होता. लग्नानंतर दोघांनीही परिवारातील सदस्यांचे आशीर्वाद घेतले. या जोडीचे हे वेडिंग मुव्हमेंट सोशल मीडियावर सगळ्यांच लक्षवेधून घेत आहेत.

राहुलचा मित्र अलीची लग्नात खास हजेरी 
बिग बॉसच्या घरात अली आणि राहुल यांची चांगली मैत्री दिसून आली . अली राहुल आणि दिशाच्या लग्नासाठी सुरुवातीपासूनच खूप उत्साही होता. बिग बॉस 14 दरम्यान राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. दिशाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बिग बॉसच्या घरात जाऊन राहुलसमोर आपल्या प्रेमाची कबुली सगळ्यांसमोर दिली होती.