Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा तेजी नोंदवली आहे. डॉलर इंडेक्स मजबूतीनंतर ग्लोबल आणि लोकल बाजारात मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. गुरुवारी कॉमेक्सवर सोनं 30 डॉलरने उसळून 2675 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. तर चांदी 2 टक्क्यांनी वाढून 30 डॉलरच्या पास पोहोचले आहे. आज सोनं 800 रुपयांनी वधारलं आहे. तर चांदी 1400 रुपयांनी वाढून 89,000 रुपयांवर स्थिरावली आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळं सोनं खरेदीचा मागणी जोरात आहे. या दिवसांत मोठ्या प्रमाणात सोन आणि चांदी खरेदी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळं मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 79,200 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज सोन्याचे दर वधारलं आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली असून सोनं 79,200 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 72,600 रुपयांवर स्थिरावली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याच्या दरात 59,400 रुपयांवर स्थिरावलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 72, 600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 79, 200 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,400 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,260 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,920 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 940 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,080रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63,360 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 47,520 रुपये
22 कॅरेट- 72, 600 रुपये
24 कॅरेट- 79, 200 रुपये
18 कॅरेट- 59,400 रुपये