आमिरच्या चित्रपटात 'या' भूमिकेसाठी अक्षय कुमारने दिलं होतं ऑडिशन, मात्र नशिबाची नव्हती साथ

हिंदी सिनेमाला यशाच्या शिखरावर नेण्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

Updated: Jul 21, 2021, 08:33 PM IST
आमिरच्या चित्रपटात 'या' भूमिकेसाठी अक्षय कुमारने दिलं होतं ऑडिशन, मात्र नशिबाची नव्हती साथ

मुंबई : हिंदी सिनेमाला यशाच्या शिखरावर नेण्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. अक्षयच्या सर्व चाहत्यांना ठाऊक आहे की, त्याचा प्रवास ईतका सोपा नव्हता. त्याने आपल्या आयुष्यात कुंगफू टिचरपासून ते शेफपर्यंत आणि मॉडेलपासून अभिनेत्यापर्यंत अतुलनीय कामगिरी केली आहे.

आमिरचा चित्रपट नाकारला गेला
अक्षय कुमारला सिनेमा जगात पाऊल ठेवणं सोपं नव्हते. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारला बर्‍याचदा रिजेक्शनचा सामना करावा लागला आणि अशाच काही नकारांपैकी एक म्हणजे आमिर खानच्या चित्रपटातली भूमिका. अक्षय कुमारने आमिर खानच्या 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटासाठी ऑडिशन दिल्याचं फारच कमी लोकांना माहिती असेल. मात्र त्याला नकार देण्यात आला होता.

या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यात आलं
आता जर आपण असा विचार करत असाल की, अक्षयने आमीरच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिलं असावं, तर तुम्ही चुकीचे आहात. एका वृत्तानुसार, त्यावेळी अक्षय कुमारने या चित्रपटात दीपक तिजोरीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. या चित्रपटात दीपकने शेखर मल्होत्राची भूमिका साकारली होती. जी भूमिका नकारात्मक होती. दीपकने ही भूमिका चांगलीच साकारली आणि चित्रपटाचा चांगला गाजावाजा झाला.

दोघांनी मिळून ऑडिशन दिलं
आपल्याला माहित असेलच की, या भूमिकेसाठी दीपक तिजोरी देखील पहिली निवड नव्हती. दीपकच्या आधी ही भूमिका मॉडेल मिलिंद सोमणला देण्यात आली होती. एका थ्रोबॅक मुलाखतीत दीपक तिजोरीने शेखर मल्होत्राच्या भूमिकेसाठी आपण आणि अक्षय कुमारने एकत्र कसं ऑडिशन दिलं याचं रहस्य उलगडलं