राज कुंद्रानंतर एकता कपूर ही अडचणीत येणार? KRK चं ट्विट

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे केले जात आहेत. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी क्राइम ब्रँचने अनेक दिवस या प्रकरणाची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं हे सगळं प्रकरण आहे. ज्यामध्ये शिल्पाचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) हा मुख्य सुत्रधार असल्याचं उघडकीस आलं. आता या प्रकरणात, कमाल खानने ( Kamal Khan ) आणखी काही सेलिब्रिटीचे नाव घेतलं आहे.

Updated: Jul 21, 2021, 06:44 PM IST
राज कुंद्रानंतर एकता कपूर ही अडचणीत येणार? KRK चं ट्विट

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे केले जात आहेत. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी क्राइम ब्रँचने अनेक दिवस या प्रकरणाची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं हे सगळं प्रकरण आहे. ज्यामध्ये शिल्पाचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) हा मुख्य सुत्रधार असल्याचं उघडकीस आलं. आता या प्रकरणात, कमाल खानने ( Kamal Khan ) आणखी काही सेलिब्रिटीचे नाव घेतलं आहे.

कमाल खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी तो इतर कलाकारांवर टीका करत चर्चेत राहण्याचा प्रय़त्न करतो. प्रत्येक विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त करतो. आता राज कुंद्राच्या अटकेनंतर केआरकेने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एकता कपूर बद्दल बोलत आहे.

यूट्यूबचा व्हिडिओ शेअर करताना कमाल आर खान याने ट्विटरवर लिहिलं आहे की, या व्हिडिओमध्ये असं म्हटलं गेलं आहे की # एकताकपूरला अटक केली जाऊ शकते, फार पूर्वी राज कुंद्रा म्हणाले होते, माझ्या नंतर त्याचा नंबर घेतला जाईल, अटक होईल."

राज कुंद्राविरोधात त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की राज कुंद्राच्या अडचणी इतक्यात संपणार नाहीत.