शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रामध्ये अंतर?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या अटकेमुळे खूप चर्चेत होती.

Updated: Oct 23, 2021, 06:48 PM IST
 शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रामध्ये अंतर?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या अटकेमुळे खूप चर्चेत होती. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अलीकडेच शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबासोबत अलिबागला पिकनीकला गेली होती. ती एका फेरीतून मांडवा ते जेट्टीकडे जाताना दिसली. तिच्यासोबत तिची आई सुनंदा शेट्टी आणि मुलं विआन आणि समिशा होत्या, पण यावेळी तिचा पती राज कुंद्रा तिच्यासोबत दिसला नाही.

पतीशिवाय शिल्पा बाहेर गेली फिरायला?
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात वाद आहे का? याबाबत अद्याप तरी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. राज आणि शिल्पाच्या घटस्फोटाच्या बातम्या याआधीही अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. शिल्पा शेट्टी कुंद्राने निळ्या रंगाचा शर्ट घातला आणि गुलाबी फ्रॉक घातलेली गोंडस समिशाला तिच्या मांडीवर घेतलं. शिल्पा शेट्टी कुंद्राचा मुलगा विआन पांढऱ्या आणि बेज रंगाच्या कॅज्युअल टी-शर्टमध्ये दिसला. सुनंदाच्या लूकबद्दल सांगायचं झालं तर तिने व्हायलेट सलवार कमीज घातला होता.

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला आहे
राज कुंद्रा गेल्या महिन्यात आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाल्यापासून अत्यंत लो प्रोफाइल ठेवलं आहे. तो प्रसिद्धीपासून दूर राहतो आणि बहुतेकदा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. विशेष म्हणजे, पॉर्नोग्राफी प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. पॉर्न व्हिडीओ शूटिंग आणि प्लॅटफॉर्मद्वारे स्ट्रीमिंगमध्ये गुंतल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती.

शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राजमध्ये अंतर?
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने वर्क फ्रंटपासून स्वतःला दूर केलं होतं. तिने सगळे रिअॅलिटी शो आणि इतर कार्यक्रमांना जाणं बंद केलं होतं. मात्र, राजला जामीन मिळाल्यापासून ती कामावर पुन्हा सक्रिय झाली. अनेकवेळा लोक सोशल मीडियावर या गोष्टीबद्दल प्रश्न उपस्थित करताना दिसले आहेत की अशा परिस्थितीत शिल्पा इतकी आनंदी कशी आहे?