आमीर खानवर 'हा' दिग्दर्शक बनवणार सिनेमा

संजय दत्त पाठोपाठ आता आमीर खानवर लवकरच बायोपिक केली जाणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 7, 2018, 07:53 AM IST
आमीर खानवर 'हा' दिग्दर्शक बनवणार सिनेमा title=

मुंबई : संजय दत्त पाठोपाठ आता आमीर खानवर लवकरच बायोपिक केली जाणार आहे. 

फिल्ममेकर राजकुमार हिरानी यांनी मिस्टर परफेक्शनिस्ट यांच्यावर बायोपिक बनवण्यात आपल्याला रूची असल्याचं सांगितलं आहे. राजकुमार हिरानी हे आमीरच्या अगदी जवळचे आहे. 

आमीर खानचं उत्तर 

राजकुमार हिरानी म्हणाले की, तुम्हाला माहितच आहे मी एक बायोपिक संजय दत्तवर तयार करत आहे. आमीर खानला पहिलं लिहू द्यावं. त्यानंतर मी त्यावर बायोपिक तयार करेन. राजकुमार हिरानी यांच्या पत्नी मनजीक हिरानी यांच्या 'हाऊ टू बी - लाइफ लेसन्स बाय बडी हिरानी' या पुस्तकाचं अनावरणाच्यावेळी आमीर उपस्थित होते.

तेव्हा त्यांच्यावर आत्मकथा लिहिण्याबाबत विचारलं. तेव्हा आमीर म्हणाला की, भरपूर लोकं मला लिहिण्यासाठी सांगत आहेत. मात्र आता माझ्याकडे अनेक सिनेमे आहेत. त्यामुळे मागच्या आठवणी आठवायचा आणि लिहायचा वेळ नाही. राजकुमार हिरानी सध्या संजय दत्त यांच्या बायोपिकवर काम करत आहेत. संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आळी आहे. अनेकदा त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.