मुंबई : सलमान खान १० मार्चला नेपाळमध्ये एक कॉन्सर्ट शो करणार होता. सलमानने त्याबाबतचं पोस्टर देखील जारी केलं होतं. पण नेपाळमधील विरोध आणि धमक्यांमुळे त्याने ते रद्द केलं.
कॉन्सर्ट रद्द झाल्याने सलमान आणि त्याचा भाऊ सोहेल खानला मोठं नुकसान झालं. हे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर हा शो पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ मार्चला पुण्यात होणाऱ्या या शोसाठी सलमान सोबत डेज़ी शाह आणि सोनाक्षी सिन्हा दोन्ही तयार होत्या पण सलमान असं वाटत होतं की फक्त या दोघांच्या बळावर पुण्याचा शो यशस्वी नाही होणार. त्यामुळे सलमानने शेवटच्या क्षणी कॅटरिनाला तयार केलं.
सलमान जेव्हा हा शो पुण्यात करण्याची तयारी करत होता. तेव्हा कॅटरिनाने इतर गोष्टींसाठी कमिटमेंट केलं होतं पण सलमानने विचारल्यानंतर तिने लगेचच यासाठी हो म्हट़लं. त्यामुळे पुण्याच्या शोमध्ये आता सलमान सोबत कॅटरिना देखील दिसणार आहे.
कटरिनाने हा निर्णय घेतला आहे की ती आता कधीच सलमानला नाही म्हणणार नाही. कारण कठीण प्रसंगात तोच तिला मदत करतो. रणबीर कपूरसोबत ब्रेकअपनंतर सलमान कॅटरिनासोबत उभा होता. असं कमीच पाहायला मिळतं. अनेक फ्लॉप सिनेमांनंतर देखील सलमानने कॅटरिनाला काम दिलं. त्यामुळे आता सलमानला कॅटरिना नाही म्हणेल असं शक्य नाही.