Transgender ची भूमिका साकारताना स्वत:ला झोकून देणारे अभिनेते माहितीयेत? दुसरं नाव महत्त्वाचं....

राजपालचा अभिनय पाहून आता बॉलिवूडमधील ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची चर्चा रंगलीय. ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारे हे अभिनेते कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

Updated: May 21, 2022, 04:04 PM IST
Transgender ची भूमिका साकारताना स्वत:ला झोकून देणारे अभिनेते माहितीयेत? दुसरं नाव महत्त्वाचं....  title=

मुंबई : अभिनेता राजपाल यादव (rajpal yadav) याचा अर्ध’ (ardh) हा आगामी वेब चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात राजपाल यादवने ट्रान्सजेंडरची भूमिका स्विकारतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राजपालचा अभिनय पाहून आता बॉलिवूडमधील ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची चर्चा रंगलीय. ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारे हे अभिनेते कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

निर्मल पांडे (Nirmal Pandey) हा बॉलीवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याने 'हद कर दी आपने' ते 'हम तुमपे मरते हैं' या सिनेमात अभिनय केला होता. तसेच निर्मल यांनी 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'डायरा' चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या त्यांच्या अभिनयावरून त्याला 1997 मध्ये फ्रान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा व्हॅलेंटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

अभिनेता विजय राज (Vijay Raaz) हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. विनोदी सह अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात विजय राज ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसला होता. या  भूमिकेतील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. रझियाच्या भूमिकेत विजय राज यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता.

परेश रावल (Paresh Rawal) हा बॉलिवूडला मोठा अभिनेता आहे. 1998 मध्ये आलेल्या तमन्ना चित्रपटात परेश रावलने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांची भूमिका नकारात्मक नव्हती. पण परेश रावलच्या सुरेख अभिनयाने सर्वांनाच चकीत केले होते. 

अभिनेता सदाशिव अमरापूरकर (Sadashiv amrapurkar) हा खलनायकाचे रोल करण्यास प्रसिद्ध होता. 1991 मध्ये आलेल्या सडक चित्रपटात अमरापूरकर यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. त्यांच्या या अभिनयाचे प्रेक्षकांनीच बरीच प्रशंसा केली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा इतकी आवडली की त्यांना सर्वोत्कृष्ट निगेटिव्ह रोलसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

आशुतोष राणा (Ashutosh rana) हा बॉलिवूडमधला दिग्गज अभिनेता आहे. भारतातील पहिल्या माजी ट्रान्सजेंडर आमदारावर बनलेला हा चित्रपट 2005 मध्ये रिलीज झाला होता. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात आशुतोष राणा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसले होते. आशुतोष राणा यांनी संघर्ष चित्रपटात लज्जा शंकर पांडेची  भूमिका साकारली होती. 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कूमार याने सुद्धा ट्रान्सजेंडरची भूमिका साकारलीय. लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात अक्षयने ट्रान्सजेंडरचा अभिनय केला होता. अक्षयच्या या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती.