Raju Shrivastav Health Update: स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Health Update) यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आहे. राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेत निर्माण करणारी बातमी आहे. राजू श्रीवास्तव काही दिवसांपूर्वी शुद्धी आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. अलीकडेच त्यांच्या भावाने त्यांच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. राजू श्रीवास्तव यांना 100 डिग्री ताप असल्याचं सांगण्यात आलं होतं. (raju shrivastav health update doctors decided to remove comedian raju srivastava ventilator support oxygen level)
एक दिवस आधी, डॉक्टरांनी त्याचं व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे. पण राजू श्रीवास्तव यांना पुन्हा ताप आला, त्यानंतर डॉक्टरांनी आपला निर्णय बदलला आहे. आता राजू श्रीवास्तव औषधांना व्यवस्थित रिस्पार्न्स देत आहेत. शिवाय त्यांचं शरीर आता योग्य प्रकारे रिस्पान्स देत आहे, असं डॉक्टरांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
SOD डॉ. पद्मा श्रीवास्तव आणि डॉ. अचल श्रीवास्तव दिल्लीच्या एम्समध्ये त्यांच्यावर उपचार करत आहेत. दोन वेळा राजू श्रीवास्तव यांचा व्हेंटिलेटरचा आधार काही काळासाठी काढण्यात आला होता, मात्र काही वेळाने त्याला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण एक चांगली गोष्ट म्हणजे राजू श्रीवास्तव आता 90 टक्के ऑक्सिजन नैसर्गिकरित्या घेऊ शकले आहेत आणि तेव्हापासून डॉक्टर व्हेंटिलेटर काढायचे की नाही या विचारात आहेत.
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर गेल्या 10 ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव हे व्हेंटिलेटर आहेत. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतायेत.