अनेक वर्षांनंतर राजू श्रीवास्तव एक कॉमेडी शो घेऊन येत आहे, कपिल शर्मा याच्या शोला देणार टक्कर?

स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे.  

Updated: Aug 4, 2021, 07:20 AM IST
अनेक वर्षांनंतर राजू श्रीवास्तव एक कॉमेडी शो घेऊन येत आहे, कपिल शर्मा याच्या शोला देणार टक्कर?

मुंबई : स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचा तब्बल 40 वर्षांचा अनुभव असलेल्या राजू श्रीवास्तव याची (Raju Srivastava) मजेदार शैली नेहमीच चाहत्यांना हसविण्यात यशस्वी ठरली आहे. आता राजू लवकरच लोकांना पोट धरुन हसविण्यासाठी पुन्हा एकदा टीव्हीच्या जगात पाऊल टाकणार आहे.

राजूच्या शोचे नाव काय असेल?

राजू श्रीवास्तव याचा (Raju Srivastava) हा शो 'द कपिल शर्मा शो' सारख्या (The Kapil Sharma Show) अनेक विनोदी कलाकारांनी बनवलेला शो असणार नाही. त्याऐवजी हा राजू श्रीवास्तवचा एक पात्री शो असेल ज्यात फक्त राजू श्रीवास्तव हास्याचे कारंजे उडविताना दिसेल. जोपर्यंत राजू श्रीवास्तव याच्या या शोच्या शीर्षकाचा प्रश्न आहे, तर आम्ही तुम्हाला सांगू की राजूच्या या शोचे शीर्षक असेल, 'हंसते रहो विद राजू श्रीवास्तव.'

हास्य शोला लोकांची पसंती मिळतेय

वृत्तसंस्था IANS शी बोलताना राजू श्रीवास्तव म्हणाले, 'आज हास्य शोला लोकांची पसंती मिळत आहे. अशा हास्य शोची मागणी खूप जास्त आहे, कारण मागणी खूप वाढली आहे. आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांनी नोकरी गमावली आहे. जे हसण्याचे निमित्त शोधत आहेत आणि ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना हसायचे आहे. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे.

राजू ओटीटीवरही पाऊल ठेवेल

टीव्हीवरून ओटीटीकडे जाणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे, राजू श्रीवास्तव म्हणाले, 'आपण काळानुसार बदलत राहिले पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जरी आता वाढ खूपच कमी आहे, परंतु कॉमेडी ओटीटीमध्ये देखील पोहोचल्यास वाढ खूप वाढेल. आम्ही चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत, म्हणून आता आम्ही ओटीटीही सोडणार नाही.