Akshay Kumar स्टारर 'Bell Bottom' चित्रपटाचा ट्रेर प्रदर्शित

उलगडणार 1984 सालच्या हायजॅकचं रहस्य

Updated: Aug 4, 2021, 07:19 AM IST
Akshay Kumar स्टारर 'Bell Bottom' चित्रपटाचा ट्रेर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'Bell Bottom' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाती प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री वाणी कपूर भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचं ट्रेलर लाँच करण्यासाठी वाणी आणि अक्षय दिल्लीत पोहोचले होते. अगदी भव्य स्वरूपात  चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सध्या सर्वत्र चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा आहे. ट्रेलर लाँच केल्यानंतर अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला. 

सोशल मीडियावर 'Bell Bottom' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करत कॅप्शनमध्ये, ' बेल बॉटम'सह मोठ्या पडद्यावरील जादू पुन्ही घेवून येत आहे.' सोबतचं अक्षयने संपूर्ण टीमला टॅग देखील केलं आहे. पाहा 'बेल बॉटम' चित्रपटाचा ट्रेलर

सांगायचं झालं तर कोरोना महामारीनंतर प्रदर्शित होणारा बेल बॉटम चित्रपट बिग बजेट आहे. एवढंच नाही तर चित्रपट 3डीमध्ये देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. अनेक वेळा चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा बदलल्यानंतर  अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहुर्त ठरला आहे. 19 ऑगस्त रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या  भेटीस येणार आहे. 

'बेल बॉटम' चित्रपटात अक्षय कुमार आणि वाणी कपूर व्यतिरिक्त हुमा कुरेशी. लारा दत्त, जॅकी भगनानी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बेल बॉटम चित्रपटाची चर्च  रंगत आहे.