का पडलीये राखी सावंत- अभिजीत बिचुकलेमध्ये वादाची ठिणगी?

 'बिग बॉस 15' मध्ये राखी सावंत आणि अभिजीत बिचुलके यांच्यात मोठा वाद. 

Updated: Dec 7, 2021, 06:32 PM IST
का पडलीये राखी सावंत- अभिजीत बिचुकलेमध्ये वादाची ठिणगी?

मुंबई : 'बिग बॉस 15' मध्ये राखी सावंत आणि अभिजीत बिचुलके यांच्यात नुकताच खूप मोठा वाद झाला.  या दोघांमधील चर्चा एवढी वाढली आहे की, दोघंही एकमेकांचे केस ओढून भांडू लागले  शिवाय राखी सावंत रागाच्या भरात घराच्या खुर्च्याही फेकू लागते. राखी सावंतच्या या रागाचं कारण म्हणजे 'बिग बॉस' स्पर्धक अभिजीत बिचुलकेने तिच्या पतीला भाड्याने घेतलेला नवरा म्हणणं आहे. 

अभिजीत बिचुलकेने राखीच्या पतीला म्हटलं भाड्याचा पती
घरातील या संपूर्ण गोंधळाचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये राखी सावंत आणि अभिजीत बिचुलके यांच्यात जोरदार भांडण होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत तिच्या पतीसोबत बेडवर झोपलेली दिसत आहे. तेव्हा अभिजीत राखीला म्हणतो, 'तू या नवऱ्याला भाड्याने घेऊन आलीस का?' ही गोष्ट ऐकून राखीचा राग अनावर झाला, ती अभिजीत बिचुलकेवर जोर-जोरात ओरडू लागली लागली.

राखी सावंत अभिजीतला खूप सुनवू लागते. ती अभिजीतला म्हणते- 'तू मला म्हणालास की, तु भाड्याचा नवरा आणला आहेस. त्यामुळे तू लक्षात भाड्याचा टट्टू आहेस हे जाणून घे.' यानंतर राखी अभिजीतचं सामान फेकण्यास सुरुवात करते. याशिवाय घरात उपस्थित असलेल्या इतर सगळ्या वस्तूही फेकू लागते आणि व्हिडिओमध्ये ती खुर्ची फेकतानाही दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी सावंत अभिजितला म्हणाली तुझी पत्नी भाड्याची
त्यातही राखीचा राग कमी होत नाही, त्यानंतर ती अभिजीतला सांगते की, 'तुझी बायको भाड्याची आहे.' यानंतर चिडलेली राखी अभिजितचे केस ओढू लागते, जे प्रोमो व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.