मोदीजी मला बर्थडे गिफ्ट म्हणून पाकिस्तान हवाय - राखी सावंत

परिषदेच्या माध्यमातून तिने पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे.

Updated: Nov 27, 2019, 08:01 PM IST
मोदीजी मला बर्थडे गिफ्ट म्हणून पाकिस्तान हवाय - राखी सावंत title=

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन अर्थात राखी सावंत कायम तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असते. व्हिडिओच्या माध्यमातून ती नेहमी सर्वांच लक्ष वेधून घेत. कधी फोटो तर कधी व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सर्वात आधी स्वत:च्या लग्नामुळे त्यानंतर बिग-बॉसमुळे ती चर्चेत होती. आता तर तिने चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. 

नुकताचं राखीने तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधत तिने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेच्या माध्यमातून तिने पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे. तर तिने मोदींकडे पाकिस्तानची मागणी केली आहे. त्यामुळे तिची ही परिषद चर्चेत येत आहे. 

'माझी फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे ज्याप्रकारे पंतप्रधान मोदींनी काश्मीरवर विजय मिळवला आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानवर विजय मिळवावा.' यावेळी तिने पंतप्रधान मोदींच्या नावाची नारेबाजी देखील केली. याआधी अनेक वेळा तिने पंतप्रधान मोदींबद्दल भाष्य केले आहे. शिवाय तिने त्यांच्यासारखे कपडे देखील घातले होते. 

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा डाव रंगला होता. त्यामुळे सर्वच स्तरात राजकीय चर्चा रंगल्या होत्या. तर अशा परिस्थिती राखी मागे कशी राहिल. या सत्तासंघर्षात राखीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.