''अंकिता लोखंडे आणि विकी दोघंही लवकरच...'' ऐकून राखी सावंत झाली शॉक; पाहा व्हिडीओ

राखी सावंतने प्रेगंन्सी न्यूजवरून भलत्याच एका अभिनेत्रीवरून खुलासा केला आहे. 

Updated: Jul 15, 2022, 07:11 PM IST
''अंकिता लोखंडे आणि विकी दोघंही लवकरच...'' ऐकून राखी सावंत झाली शॉक; पाहा व्हिडीओ

मुंबईः सध्या बॉलीवूडमध्ये लग्न, डेटिंग आणि प्रेग्नंन्सी अशा नानाप्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे तेव्हा आलियापासून ते कतरिनापर्यत सगळेच प्रेगंन्सीच्या गप्पा मारत आहेत. आलिया आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातमीला जेवढे उधाण आले नसेल तेवढे उधाण त्या दोघींच्या प्रेगनन्सीवरून आले आहे त्यात मध्येच राखी सावंत हिने अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. जो ना आलियावर आहे ना दिपिकावर ना कतरिनावर. राखी सावंतने प्रेगंन्सी न्यूजवरून भलत्याच एका अभिनेत्रीवरून खुलासा केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आलिया भट्टनंतर कतरिनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सतत चर्चेत असतानाच आणखी एक अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अंकिता लोखंडे आहे. नुकतेच अंकिता आणि विकी जैन यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. अकिंता इतक्या लूज फिटिंग कपड्यांमध्ये दिसली की तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येऊ लागल्या. यादरम्यान राखी सावंतने अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलल्याने तिचे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. 

राखी सावंतने नुकतंच मीडियाशी बोलताना अंकिता लोखंडेबद्दल असे बोलले की मला आशा आहे की ते दोघं लवकरच चांगली बातमी देत आहेत. मला आनंद आहे की अंकिता आई होतंय..

अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबर 2021 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. या दोन्ही स्टार्सचे मुंबईत शाही लग्न थाटात पार पडले. नुकतेच त्यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाल्याबद्दल दोघांनी केक कापून एकत्र सेलिब्रेशन केले. अंकिताने या सेलिब्रेशनचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कॅप्शनमध्ये अंकिताने लिहिले की 'लग्नाच्या 6 महिन्यांच्या बेबी टू हॅप्पी. सगळे दिवस इतके खास बनवल्याबद्दल कुटुंबाचे आभार. तुम्हा सर्वांचे खूप प्रेम.. मित्रपरिवाराचे विशेष आभार..हा क्षण संस्मरणीय बनवल्याबद्दल. मी आतापासून सगळ्यांना मिस करत आहे. लवकर परत या.. तुम्हा सर्वांचे खूप प्रेम.. रिया विवान आंटी तुझी आठवण येत आहे.' त्यामुळे लग्नाच्या 6 महिन्यांच्या बेबी टू हॅप्पी असं कॅप्शन ठेवल्याने सोशल मीडियावर ती प्रेगंन्ट असल्याच्या बातमीला उधाण आले आहे.  

About the Author