मराठी शोमधून परताच राखी सावंतच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; म्हणाले, 'अब दवा नही दुवा करें...'

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चित्रपट कलाकारही शोक दुख: व्यक्त करताना दिसत आहेत. 

Updated: Jan 9, 2023, 07:07 PM IST
मराठी शोमधून परताच राखी सावंतच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; म्हणाले, 'अब दवा नही दुवा करें...' title=

मुंबई : सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नुकतीच मराठी शोमधून बाहेर आली आहे. बाहेर येताच तिने तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी शेअर केली आहे. राखीने स्वत:चा रडत एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राखीने आपल्या आईची तब्येत बिघडल्याचं सांगितलं. एवढंच नव्हेतर अभिनेत्रीच्या आईला टाटा मेमोरिअल कँन्सर हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं आहे. या व्हिडिओत अभिनेत्री रडताना दिसत आहे. 

आईची अवस्था पाहून राखीला अश्रू अनावर
हा व्हडिओ शेअर करत राखीने आपल्या आईच्या हेल्थ अपडेट (Health Update) दिली आहे. एवढंच नव्हेतर अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांकडे आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहते कमेंट्स करुन राखीला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

या सेलिब्रिटींनी व्यक्त केलं दुख:
अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चित्रपट कलाकारही शोक दुख: व्यक्त करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary), सोफिया हयात (Sofia Hayat), अफसाना खान (Afsan Khan), राहुल वैद्य (Rahul Vaidya), पवित्रा पुनिया (Pavitra Punia) यांच्यासह अनेक स्टार्सनी राखीला धीर दिला आणि तिच्या आईच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल होत आहे हा व्हिडिओ (Video Viral)
व्हिडिओमध्ये राखी सावंत रडताना दिसत आहे. आणि म्हणतेय की, "मी बिग बॉस मराठीच्या घरातून काल रात्रीच बाहेर पडली आहे आणि आता मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आईची तब्येत ठीक नाही. ती रुग्णालयात आहे. तुम्ही सर्वांनी कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. बिग बॉसमध्ये असताना याबद्दल मला कोणीही सांगितलं नाही की,  तिची तब्येत बरी नाहीये. मला माहित नव्हते की माझी आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिला आता ब्रेन ट्यूमर प्लस कॅन्सर झाला आहे."
 
चित्रपट आणि टीव्ही शोपासून दूर असलेली राखी सावंत आजकाल फक्त टीव्ही रिअॅलिटी शोमध्येच दिसते. नुकतीच ही अभिनेत्री 'बिग बॉस मराठी' या शोची फायनलिस्ट झाली होती.