न्यासा, जान्हवी, सुहानाबरोबर आता समायराच्या हॉटनेसची चर्चा, करिश्मा कपूरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा आहे, अनेक सेलिब्रेटिंच्या मुलांच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरची चर्चा होत असते. आता यात आणखी एका नावाच समाशे झाला आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलीचे हॉट फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

Updated: Jan 9, 2023, 06:53 PM IST
न्यासा, जान्हवी, सुहानाबरोबर आता समायराच्या हॉटनेसची चर्चा, करिश्मा कपूरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? title=

Entertainment : बॉलिवूड स्टार्स जितके लोकप्रिय आहेत तितकीच त्यांची मुलांच्या ग्लॅमरची (Glamorous) चर्चा होत असते. स्टार किड्स (Star Kids) असल्याने त्यांच्यावर कायमच कॅमेरे रोखलेले असतात. या स्टार किड्सच्या प्रायव्हेट पार्टीचे फोटोही अनेकवेळा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. नविन वर्षाच्या पार्टीत अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) हिच्या ग्लॅमरस फोटोंनी धुमाकूळ घातला होता. याचबरोबर जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या पार्टीचे फोटोही व्हायरल होत असतात.

बॉलिवूडमध्ये स्टार किड्स लोकप्रिय होण्याचा ट्रेंड आहे. सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर हिट आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर सुहाना खान आणि न्यासा देवगन अद्याप बॉलिवूडपासून दूर आहे. या स्टार किड्समध्ये आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूरच्या (Samaira Kapoor) ग्लॅमरस फोटोची सध्या चर्चा आहे. (actress karishma kapoor daughter samaira hot photo viral)

समायरा कपूरच्या ग्लॅमरची चर्चा
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. पण काही कारणाने हे नातं जुळण्याआधीच तुटलं. त्यानंतर 2003 मध्ये करिश्माने उद्योपती संजय कपूरशी (Sanjay Kapoor) लग्न केलं. त्यांना समायरा आणि कियाम हो दोन झाली. सर्व सुरळीत सुरु असताना 2016 मध्ये म्हणजे लग्नाच्या 13 वर्षांनी करिश्मा-संजयचा घटस्फोट झाला. त्यानंतर दोन्ही मुलं करिश्मासोबत राहतात. समायला ही करिश्माची मोठी मुलगी. करिश्माप्रमाणेच समायराही दिसायला सुंदर आहे. 

समायरला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
बॉलिवूडच्या इतर स्टार किड्सप्रमाणेच समायराही  सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले ग्लॅमरस फोटो ती इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. समायरा दिसायला अतिशय स्लीम आणि सुंदर आहे.  समायराचे करीश्मा कपूर आणि करीना कपूरबरोबचे पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कपूर कुटुंबियांच्या अनेक कार्यक्रमात समायरा हजेरी लावते. 

समायरा नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. समायरा आई करीश्मासोबत वेगळी राहत असली तरी तिचे वडिल संजय कपूरसोबतही अजूनही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. समायराला अनेकवेळा संजय कपूर आणि प्रिया सचदेवसोबत पाहिलं गेलं आहे. मात्र इतर स्टार किड्सप्रमाणे समायरला लाइमलाईटमध्ये राहणं आवडत नाही. विशेषता ती लेट नाईट पार्टीपासूनही दूरच असते.

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री
करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 1991 मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून तीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर तीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलं.