असे आहे राखी सावंतचे दुबईतील आलिशान घर, व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक

राखी सावंत हिने तिच्या नव्या घराचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Updated: Jun 17, 2022, 09:02 PM IST
असे आहे राखी सावंतचे दुबईतील आलिशान घर, व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक title=

दुबई :  अभिनेत्री राखी सावंत हिने तिच्या दुबईमधील घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला राखी सावंत 'ये तेरा घर ये मेरा घर' हे गाणे गाऊन सर्वांचे स्वागत करते. यानंतर ती तिच्या अपार्टमेंटचे वेगवेगळे भाग दाखवते. व्हिडिओमध्ये राखी सावंत तिच्या आलिशान घरातील बेडरूम, बाथरूम आणि किचन दाखवत आहे.

राखी सावंत सध्या विलासी जीवनाचा आनंद घेत आहे. तिने दुबईत एक भव्य घर विकत घेतले आहे. आता राखीनेही तिच्या चाहत्यांना या सुंदर घराची सफर घडवून आणली आहे. तिने आपल्या नवीन घराचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय.

काळ्या आणि पांढर्‍या संगमरवरीने सुशोभित केलेल्या, या घरात आरामदायी सोफा सेट, आलिशान बेड आणि सुंदर आरसे आणि प्रकाशांनी सजवलेले स्नानगृह आहे.

घर पाहून चाहते खूश

व्हिडिओमध्ये राखी गुलाबी रंगाच्या साडीत आनंदाने तिच्या घराची माहिती देत ​​आहे. यापूर्वी राखीने सांगितले होते की, तिचा नवा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी याने दुबईत तिच्या नावावर घर विकत घेतले आहे. राखीचे हे घर पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. चाहत्यांनीही तिचे जोरदार अभिनंदन केले आहे. 

एका यूजरने लिहिले की, 'का माहित नाही, पण जेव्हा मी राखीला आनंदी पाहतो तेव्हा मला खूप आवडते. देव या सुंदर व्यक्तीला आशीर्वाद दे. आणखी एका युजरने लिहिले, 'लव्ह यू राखी, यार, तुला असे पाहून मला खूप आनंद झाला.' 'सुंदर दिल वाली.'

राखी बॉयफ्रेंडसोबत राहते

राखी सावंत शेवटची बिग बॉस 15 मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती रितेश होता. मात्र, पतीकडून फसवणूक झाल्याने राखीने त्याला सोडून दिले. आता राखीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. राखी सावंत प्रेमात पडली असून तिच्या प्रियकराचे नाव आदिल दुर्रानी आहे. दोघांना अनेकदा विमानतळावर एकत्र स्पॉट केले जाते.

काही काळापूर्वी राखीने सांगितले होते की ती आणि आदिल एकत्र राहतात. ती म्हणाली, 'हो, आदिल आणि मी एकत्र राहतो. आदिल लवकरच मुंबईला शिफ्ट होणार आहे. त्याचा कारचा व्यवसाय आहे, जो मुंबईत विस्तारण्याची त्यांची योजना आहे.