Rakhi Sawant on Sonali Phogat Death case : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं गोव्यात निधन झालं होतं. सुरूवातीला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र गोवा पोलिसांनी तपासानंतर सोनालीचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोनालीच्या PA नेच तिची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. अशातच अभिनेत्री राखी सावंतने सोनालीच्या मृत्युप्रकरणाबाबत धक्कादायक दावा केला आहे.
मला सोनाली यांच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा मला धक्का बसला. मला पहिल्याच दिवसापासून सोनाली यांची हत्या झाल्याचा संशय होता. सोनाली माझ्यासोबत बिग बॉसमध्ये होत्या. मुलीवर त्यांचं प्रेम होतं, सोनालींनी त्यांच्या PA वर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. आता त्या ह्यात नसताना हे बोलणं बोलणं चुकीचं ठरेल मात्र हृदय विकाराने त्यांचा मृत्यू होऊच शकत नसल्याचं राखी सावंत म्हणाली.
मी व्हायरल व्हिडीओ पाहिला त्यामध्ये त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. मी भाजप पक्षाला विनंती करते, ज्याने कोणी सोनाली यांना मारलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यांच्या PA ने सोनाली यांच्या मुलीला अनाथ केलं आहे. मला पहिल्यापासून त्यांच्या PA वर संशय होता. मी जितक्यावेळा सोनालीला भेटले त्यावेळी PA असायचा मात्र त्याला पाहिलं की मला त्याचा राग यायचा. तोंडावरून तो गुन्हेगार वाटत होता. शेवटी ज्याची भीती होती तेच घडल्याचं राखी म्हणाली.
गोव्यातील (Goa) एका हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आणि त्यानंतर फोगट यांचा मृत्यू झाला. हॉटेलमधील या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला होता. सोनाली फोगट यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासोबत अत्याचार झाल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी फोगाट यांच्या पीएसह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे.