HCA अवॉर्डमध्ये अभिनेत्रीनं स्तुती करताच लााजला Ram Charan म्हणाला, 'मी क्यू विसरलो...'

Ram Charan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेळी राम चरणला पाहता तिथे उपस्थित असलेले लोक हसू लागले. राम चरणचा हा व्हिडीओ हॉलिवूड क्रिटिक्स एसोसिएशन अवॉर्ड 2023 मधील आहे. 

Updated: Feb 26, 2023, 11:25 AM IST
HCA अवॉर्डमध्ये अभिनेत्रीनं स्तुती करताच लााजला Ram Charan म्हणाला, 'मी क्यू विसरलो...' title=

Ram Charan In Hollywood Critics Association Film Awards : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा गेल्या अनेक दिवसांपासून RRR मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणी तर सगळ्यांच्या पसंतीस उतरली आहेत. एकीकडे भारतीय RRR चित्रपटामुळे ऑस्कर मिळणार अशी अपेक्षा करत आहेत. कारण 'नाटू नाटू' या गाण्याला नॉमिनेशन मिळालं आहे. तर हॉलिवूड क्रिटिक्स एसोसिएशन अवॉर्ड 2023 मध्ये आरआरआर चित्रपटाला चार अवॉर्ड मिळाले. दरम्यान, या अवॉर्डशोमध्ये राम चरणसोबत एमसी मार्वल अभिनेत्री अंजली भिमानी (Anjali Bhimani) राम चरण विषीय अनेक चांगल्या गोष्टी बोलली की तो लाजला आणि त्यानंतर तो त्याला काय बोलायचे होते ते विसरला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

राम चरणचा हा व्हिडीओ Absolute India News नं शेअर केला आहे. या व्हिडीओत अंजली बोलते की खरं सांगायचं झालं तर, जर मी त्याच्या (राम) शेजारी उभी आहे तर ती मला काहीही बोलू शकते. मला काही फरक पडत नाही, कारण रामच्या शेजारी उभी असल्यामुळे मी आधीच जिंकले आहे. मी आणि इथे उपस्थित असलेले सगळे आरआरआरचे फॅन आहेत. अंजलीनं इतकं काही बोलताच राम लाजला आणि तिला धन्यवाद म्हणाला. पुढे आता काय बोलायचे हे राम विसरला आणि म्हणाला मला काय बोलायचे होते ते मी विसरलो. टेलिप्रॉम्प्टरवरील त्याचा क्लू तो विसरला आहे. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक हसू लागले. 

या व्हिडीओत आपण पाहून शकतो की अंजलीनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दरम्यान, यावेळी अंजलीनं नाटू नाटू या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्नही केला, मात्र शेवटी ती म्हणाली की तिला तिचा ड्रेस किती साथ देईल हे माहित नाही. तर राम चरणनं तपकिरी रंगाचा सूट परिधान केला होता. 

हेही वाचा : मी मद्यपान करते आणि ड्रग्स घेते, Amitabh Bachchan वर प्रेम...; Rekha यांनी केला होता धक्कादायक खुलासा

चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S.S Rajamouli) यांनी सर्वोत्कृष्ट स्टंटसाठी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी भाषणात 'संपूर्ण टीमनं साथ दिल्याचे म्हटले. संपूर्ण चित्रपटात अनेक अॅक्शन सीन आहेत. आम्ही फक्त 2-3 शॉर्डसाठी बॉडीडबलचा वापर केला. अभिनेत्यांनीच सगळे स्टंट केले. ते सगळे अप्रतिम आहेत. चित्रपटासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र संघर्ष केला. मी त्यांचे आभार मानतो. चित्रपट बनवण्यासाठी आम्ही जवळपास 320 दिवस मेहनत केली.