मी मद्यपान करते आणि ड्रग्स घेते, Amitabh Bachchan वर प्रेम...; Rekha यांनी केला होता धक्कादायक खुलासा

Rekha यांनी एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला होता. 

Updated: Feb 25, 2023, 06:43 PM IST
मी मद्यपान करते आणि ड्रग्स घेते, Amitabh Bachchan वर प्रेम...; Rekha यांनी केला होता धक्कादायक खुलासा title=

Rekha On Being Alchoholic and Doing Drugs : बॉलिवूड अभिनेत्री रेखा या लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. रेखा (Rekha) यांनी आजवर अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखा यांनी फक्त 70 चे दशक नाही तर 80 च्या दशकातही हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. खरंतर रेखा यांनी वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या रेखा यांनीनंतर चित्रपटसृष्टी गाजवली. खरंतर रेखा यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अभिनयाला सुरुवात केली होती. सावन भादो हा रेखा यांचा पहिला चित्रपट होता. 

रेखा या त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यात त्यांना नेहमीच चढ-उतारांनी भरलेले आहेत. रेखा या नेहमीत त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांनी एकदा सिम्मी ग्रेवालच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी रेखा यांनी सिम्मी ग्रेवालच्या (Simmi Grewal) शोमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले. त्यात त्यांनी अशा काही गोष्टींचा खुलासा केला होता, ज्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला होता.  यावेळी सिम्मी यांनी रेखा यांना प्रश्न विचारला की त्यांनी कधी ऐकले नाही की रेखा यांनी मद्यपान केले आहे. त्यावर उत्तर देत रेखा म्हणाल्या की, 'त्या नक्कीच दारू पितात आणि ड्रग्जही घेतात. याशिवाय त्या पुढे म्हणाल्या की त्या अत्यंत अपवित्र आणि वासनेने भरलेल्या आहेत. मला आता विचारा की कशावर आहे हे सगळं... तर त्याचं उत्तर आयुष्य आहे. 

हेही वाचा : 'लक्ष्य' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत!

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा या  'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवरून झाली होती. याविषयी देखील सिम्मी यांनी रेखा यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत रेखा म्हणाल्या, मला आजपर्यंत अशी कोणतीही व्यक्ती, महिला-पुरुष किंवा मुल भेटलेलं नाही जे माझी मदत करू शकेल. जेणकरून मी त्यावर खूप प्रेम करेन. मी कोणत्या गोष्टीला नकार देते, की मी त्यांच्या प्रेमात नाही, मी नक्कीच त्यांच्या प्रेमात आहे.