Ram Gopal Varma यांच पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; दाऊद इब्राहिमचे मानले आभार

बॉलिवूडमधून रामूला केलं बॅन

Updated: Jan 26, 2021, 08:57 AM IST
Ram Gopal Varma यांच पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; दाऊद इब्राहिमचे मानले आभार  title=

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma Contraovercy Statement on Dawood Ibrahim) हे आपल्या सिनेमांप्रमाणेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना टीकांना सामोरे जावं लागलं आहे. आतापण राम गोपाल वर्मा यांनी एक असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या सिनेमा आणि यशस्वी करिअरचं श्रेय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Underworld Don Dawood Ibrahim)  दिलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये क्राइम आणि अंडरवर्ल्ड संबंधीत अनेक सिनेमांच दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमांनी खूप प्रशंसा मिळवली. राम गोपाल वर्मा यांचा आगामी सिनेमा 'D Company' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांचा हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमच्या जीवनावर आधारित आहे. राम गोपाल वर्माने नुकत्याच एका इंग्रजी वेबसाइट स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

मुलाखतीत राम गोपाल वर्माने आपल्या करिअरबाबत चर्चा केली. त्यांनी आपल्या यशस्वी सिनेमे आणि करिअरचं सगळं श्रेय दाऊद इब्राहिमला दिली आहे. राम गोपाल वर्मा म्हणतात की,'मी दाऊद इब्राहिमचा कायमच आभारी राहिन. मी गँगस्टरवर सिनेमे तयार करून आपलं करिअर बनवलं. खरं सांगायचं तर मला माणसाच्या डार्क साइडमध्ये जास्त रस आहे.'

मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी 'D Company' या सिनेमाबद्दल माहिती दिली. ही गोष्ट इनसाइडर्सकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. बॉलिवूडमधून राम गोपाल वर्मा यांना वगळ्यात आलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी कलाकार आणि कर्मचारी यांचे १.२५ करोड रुपये थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने कर्मचाऱ्यांनी राम गोपाल वर्मा यांना बॅन करण्यात आलं आहे. २ संघटनांपैकी कोणतीही संघटना राम गोपाल वर्मा यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राम गोपाल वर्मा बॉलिवूड बाहेर चित्रपटांची निर्मिती करत असल्याचं म्हटलं जात आहे.