Bigg Boss 3 : स्पर्धकाचा घरात सापडला मृतदेह

धक्कादायक घटना  

Updated: Jan 27, 2021, 10:01 AM IST
Bigg Boss 3 : स्पर्धकाचा घरात सापडला मृतदेह

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि Bigg Boss 3ची स्पर्धक जयश्री रमैया (Jayashree Ramaiah)चा मृतदेह तिच्या राहत्या घरात दिला आहे. राहत्या घरात गळफास घेवून तिच्या जीवनाचा प्रवास कायमचा संपवला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जयश्री डिप्रेशनमध्ये होती. अखेर मानसिक तणावाखाली येत तिने या जगाचा निरोप घेतला आहे. बंगळुरूच्या संध्या किरण आश्रममध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. 

कोई वर्णन उपलब्ध नहीं है.

जयश्री बिग बॉस भाग 3ची स्पर्थक होती. तिच्या अशा जाण्यामुळे कन्नड कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 जुलै 2020 साली जयश्रीचा एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ट्विटमध्ये तिने 'मी हे जग सोडून जात आहे. या वाईट जगाला आणि डिप्रेशनला गुडबाय..' असं लिहीलं होतं. 

असं ट्विट केल्यानंतर तिने पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईवद्वारे चाहत्यांना जिवंत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिने 26 जुलै 2020 रोजी लाईव व्हिडिओ डिलीट केला होता. गेल्या काही दिवसांपासून जयश्री मानसिक तणावाचा सामना करत होती. 

सहा महिन्यांपूर्वी दिले होते आत्महत्येचे संकेत 

जुलै २०२० मध्ये जयश्रीने फेसबुकवर लाइव्ह येत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने जीवनाचा कंटाळा आल्याचं म्हटलं होतं. तसंच मला मृत्यू मिळावा अशी केविलवाणी विणवणीदेखील केली होती. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीपने तिची मदत केली होती. तिला या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ६ महिन्यांनंतर अखेर राजश्रीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

'मी सोडते सगळं. या जगाला आणि नैराश्याला कायमचा निरोप देत आहे. हे सारं मी पब्लिसिटी स्टंटसाठी करत नाहीये. मला सुदीप सरांकडून कोणतीही आर्थिक मदत सुद्धा नकोय. मला जगायचं नाही, कारण मी माझ्या नैराश्याचा सामना करु शकत नाहीये, असं जयश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.