Ramayana Sunil Lahiri : 90 च्या दशकातील 'रामायण' ही मालिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या मालिकेत अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. ते तिघेही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी बुधवारी अयोध्येत पोहोचले आहे. त्यावेळी त्यांची एक झलक देखील प्रेक्षकांना व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान, या सगळ्यात 'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी हे यांना रूम मिळेना. हॉटेलची बुकिंग न मिळण्यावर नाराजी व्यक्त करत केलं वक्तव्य.
सुनीन लहरी यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येत होणाऱ्या एका अडचणीविषयी सांगितले आहे. सुनील लहरी म्हणाले, अयोध्येला पाहिल्यावर विश्वास बसत नाही की हे तेच शहर आहे, जिथे आम्ही दोन वर्षांपूर्वी शूट करण्यासाठी आलो होतो. हे खूप बदलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या हवेत देखील एनर्जी जाणवते. इथले रस्ते किंवा रस्त्याच्या कडेला असलेली दुकानं आणि घरं सगळ्यांमध्ये भक्ती दिसते. शहर पूर्ण स्वच्छ झालं आहे.
अयोध्येची स्तुती केल्यानंतर सुनील यांनी पुढे सांगितलं की 'एक अडचण ही आली आहे की हॉटेलमध्ये बुकिंग मिळत नाही आहे. तिथे असलेल्या सगळ्या हॉटेल्सची बूकिंग आधीच झाली आहे आणि तिथे एकही रूम खाली नाही. अशात जर मला रूम मिळाला नाही, तर दर्शन कसं होतील हे कळतं नाही. माझ्या फ्लाइटंचं बुकिंग कन्फर्म झालं आहे, पण दुसरीकडे रूमविषयी हा विचार करतोय की जर श्रीराम यांनी तिथपर्यंत बोलावलं आहे तर नक्कीच रूमची सोय होईल.'
दरम्यान, फक्त सेलिब्रिटी नाही तर नेटकरी देखील तितकेच उत्सुक आहेत. सेलिब्रिटी तर त्यांना मिळालेल्या निमंत्रणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याचे फोटो व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, अक्षय कुमार सारख्या कलाकारांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलं. तर दुसरीकडे दाक्षिणात्य कलाकारांविषयी बोलायचं झालं तर रजनीकांत,चिरंजीवी, मोहनलाल, प्रभास, राम चरण, यश, धनुष आणि ऋषभ शेट्टी या कलाकारांना निमंत्रीत करण्यात आलं आहे.