Rambha Accident : मुलांना शाळेतून घरी नेताना अभिनेत्री रंभाचा भीषण अपघात

Salman Khan Actress Accident : 'बंधन' (Bandhan), 'जुडवा' (Judwaa) आणि 'क्रोध' यासारख्या सुपरहिट चित्रपटांची अभिनेत्री रंभा आणि तिचे मुलं कॅनडात (Canada) अपघाताची शिकार (Rambha Car Accident) झाली. मिळालेल्या माहितीनुसार रंभा मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना ही घटना घडली. रंभाची धाकटी मुलीला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Updated: Nov 1, 2022, 12:18 PM IST
Rambha Accident : मुलांना शाळेतून घरी नेताना अभिनेत्री रंभाचा भीषण अपघात title=
Rambha car accident in canada Instagram photo Post nmp

Rambha Car Accident : बॉलीवूडमध्ये सलमान खान (Salman Khan) आणि गोविंदासारख्या (Govinda) स्टार्सची सहअभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात झाला आहे. 'बंधन' (Bandhan), 'जुडवा' (Judwaa) आणि 'क्रोध' यासारख्या सुपरहिट चित्रपटांची अभिनेत्री रंभा आणि तिचे मुलं कॅनडात (Canada) अपघाताची शिकार (Rambha Car Accident) झाली. मिळालेल्या माहितीनुसार रंभा मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना ही घटना घडली. रंभाची धाकटी मुलीला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

एअर बॅगमुळे जीव वाचला? (air bags save lives?)

अभिनेत्री रंभाने तिच्यासोबत झालेल्या दुर्घटनेची माहिती सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. रंभाने सांगितलं की, 'मुलांना शाळेतून घरी घेऊन जाताना चौरस्त्यावर आमच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिली. मी आणि माझी आया मुलांसोबत गाडीत होतो. आम्ही सर्व सुखरूप आहोत, किरकोळ जखमा झाल्या आहेत. माझी छोटी साशा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. हे खूप महत्त्वाचं आहे. रंभाने तिच्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्टसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी, त्याने आपल्या कारचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत जे अपघातानंतर अत्यंत वाईट अवस्थेत दिसत आहेत. एअर बॅग उघडल्यामुळे रंभा आणि इतर लोकांचा जीव वाचला आहे. (Rambha car accident in canada Instagram photo Post nmp)

रंभाबद्दल माहिती

जवळपास दोन दशकात त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. रंभाची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. एक काळ असा होता जेव्हा त्याने दिव्या भारतीसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीलाही मागे सोडलं होतं. रंभाने 'जल्लाद' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'जंग', 'कहार', 'जुडवा', 'बंधन' आणि 'जानी दुश्मन' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.