रणबीर-आलियाच्या 21 वर्षांपूर्वीच्या 'त्या' फोटोवरुन वाद; लोक म्हणाले, 'हे फार विचित्र वाटतंय'

Ranbir - Alia's old Photo : रणबीर कपूर यांचा 21 वर्ष जुना तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 29, 2024, 12:23 PM IST
रणबीर-आलियाच्या 21 वर्षांपूर्वीच्या 'त्या' फोटोवरुन वाद; लोक म्हणाले, 'हे फार विचित्र वाटतंय' title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir - Alia's old Photo : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही अनेकदा चर्चेचा विषय ठरते. पण तुम्हाला माहितीये का? आलिया आणि रणबीरची पहिली भेट कधी झाली होती. जेव्हा आलिया ही 9 वर्षांची होती आणि रणबीर हा 20 वर्षांचा होता. ते दोघे त्यावेळी 'बालिका वधू' या मालिकेत काम करणार होते. त्यासाठी त्यांनी एक फोटोशूट आणि ऑडिशन देखील दिलं होतं. आलियानं याविषयी एका मुलाखतीत सांगितलं. त्याशिवाय आलियानं सांगितलं की त्यावेळी काढलेले फोटो तिनं फ्रेम करून ठेवले आहेत. आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तर सोशल मीडियावर एक नवा वाद सुरु झाला आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक ब्लॅक एंड व्हाईट फोटो व्हायरल होतोय. या फोटोत आलिया ही 9 वर्षाची असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आलिया भट्ट ही नववधूच्या लूकमध्ये दिसते. तर वयानं 11 वर्ष मोठा असलेल्या रणवीरच्या प्रेमात आलिया कधी पडली? तिला कसं लहाणपणीच रणबीरवर प्रेम झालं हे सांगितलं आहे. 

ranbir and alia s 21 year back photo is a talk of the town netizens said it s really odd

रणबीर आणि आलियाचा हा व्हायरल होणारा फोटो त्यांच्या शेल्फमध्ये ठेवण्यात आला आहे. हा फोटो सध्या रेडिटवर फार व्हायरल होतोय. काही चाहत्यांनी आलिया आणि रणबीरच्या या फोटोला क्यूट असं म्हटलं आहे. तर काही लोकांनी त्यांच्या या फोटोला पाहून त्यांच्या लग्नाला त्यांचं नशिब म्हटलं आहे.  मात्र, काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या फोटोला भयानक म्हटलं आहे. आलिया आणि रणबीरच्या जोडीची अनेकांनी स्तुती केली आहे. काही नेटकऱ्यांना आश्चर्य झालं. त्यांनी म्हटलं की आता यावरून कोणालाही काही तक्रार नाही, कारण त्या दोघांचं लग्न झालं आहे. पण एका लहाण मुलीचा 20 वर्षांच्या मुलासोबत रोमॅन्टिक आहे असं म्हणायला कसं तरी वाटतं. तर काही नेटकऱ्यांनी आलिया आणि रणबीरच्या या फोटोटी तुलना सैफ अली खान आणि करीना कपूरसोबत करण्यात आली. त्यांनी म्हटलं की है कसं आहे माहितीये का जसं सैफनं अमृतासोबत लग्न केल्यानंतर छोटी करीना तिथे येऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत होती. त्याचवेळी सैफनं तिच्या डोक्यावर हाथ ठेवला होता. 

हेही वाचा : दीपिका-रणवीर होणार आई-बाबा! बाळाच्या जन्माच्या महिन्यासहित घोषणा

आलिया ही लहाणपणापासून रणबीरची चाहती होती आणि तिला तो आधीपासून फार आवडायचा. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिनं रणबीरसोबत फक्त काम केलं नाही तर लग्न देखील केलं. आता त्यांनी एक मुलगी असून राहा असं तिचं नाव आहे.