शाळेत हळूच टेबलाखाली लपून रणबीर कपूर पाहायचा तरी काय? ज्यासाठी लेडीज टिचर द्यायच्या शिक्षा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने स्वत: ला सिनेविश्वात एक यशस्वी कलाकार म्हणून सिद्ध केलं आहे.

Updated: Sep 3, 2021, 08:47 PM IST
शाळेत हळूच टेबलाखाली लपून रणबीर कपूर पाहायचा तरी काय? ज्यासाठी लेडीज टिचर द्यायच्या शिक्षा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने स्वत: ला सिनेविश्वात एक यशस्वी कलाकार म्हणून सिद्ध केलं आहे. रणबीर कपूरने बऱ्याच काळापासून रोमँटिक आणि चॉकलेट बॉय कॅरेक्टर साकारले आहेत आणि आता तो सतत वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' आणि 'शमशेरा' सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.

शिक्षकांचे पाय धरण्यासाठी गेला
पडद्यावर रणबीर कपूर कितीही दिसला तरी तो खऱ्या आयुष्यात खूप मस्त व्यक्ती आहे. रणबीर कपूरने एका शो दरम्यान सांगितलं होतं की, तो शाळेच्या दिवसात टेबलखाली लपून आपल्या महिला शिक्षकाच्या पायाकडे टक लावून पाहत असे. रणबीर कपूरने सांगितलं की, जेव्हा त्याला हे करताना पकडलं गेलं तेव्हा त्याला शिक्षाही झाली. त्याची आई नीतू कपूरला शाळेत बोलावले आणि संपूर्ण गोष्ट तिच्यासमोर सांगितली.

आयुष्य चढ -उतारांनी भरलेलं आहे
रणबीर कपूरचं वैयक्तिक आयुष्य चढ -उतारांनी भरलेलं आहे. रणबीर कपूर अनेक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. शेवटी तो आता आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच दोघांच्या लग्नाच्या बातम्याही सतत येत आहेत.

लवकरच आलिया भट्टशी करणार लग्न?
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघांनीही उघडपणे आपलं प्रेम जाहीर केलं आहे आणि त्यांच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र या दोघांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम करताना दिसतील. या दोघांचा एकत्रितपणे हा पहिलाच चित्रपट असेल.