मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं पुन्हा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणकडे पाहिले जायचे. पण या दोघांच्या परिकथेत कतरिना आली आणि रणबीर- दीपिकाचे ब्रेकअप झालं. रणबीर आणि कतरिना लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत असताना त्यांच्या ब्रेकअपची बातमीही पुढे आली.
रणबीर कपूरचं आता पुन्हा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. कतरिनानंतर रणबीरच्या आयुष्यात पाकिस्तान अभिनेत्री माहिरा खान आली. दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं. पण आता दोघांचं ब्रेकअप झालं आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच तो अनेक रिलेशनशिपमध्ये होता.
सावरिया या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या रणबीरचे नाव याच सिनेमातील अभिनेत्री सोनम कपूरसोबतही जोडले गेले. पण सोनमने एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, रणबीर हा बॉयफ्रेण्ड मटेरियल नाही. त्याच्यासोबत नात्यात राहणं तिच्यासाठी फार कठीण आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर नंदिता महतानी आणि रणबीर दोघंही बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर असल्यामुळे दोघांचे नाते फार पुढे जाऊ शकले नाही.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत त्याचे संबंध जोडले जात असतांनाच आता दोघं वेगळे झाल्याच्या चर्चा आहेत. दुबईतील एका कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहण्यात आले होतं. पण तेव्हा त्या दोघांनीही सांगितले होते की, ते दोघे सिंगल असून आनंदी आहेत.