घटस्फोटानंतर वडिलांसोबत दिसले करिश्मा कपूरची मुलं

पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर मुलगी आणि मुलाची जबाबदारी सांभाळत आहे. पण नेहमी ही मुलं आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येतात.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 19, 2018, 11:17 AM IST
घटस्फोटानंतर वडिलांसोबत दिसले करिश्मा कपूरची मुलं

मुंबई : पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर मुलगी आणि मुलाची जबाबदारी सांभाळत आहे. पण नेहमी ही मुलं आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येतात.

फोटो केले शेअर

समाइरा आणि कियान दोघेही आपले वडील संजय कपूर यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीचे फोटो संजयची आताची पत्नी प्रिया सचदेव हिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये दोन्ही मुलं वडिलांसोबत वेळ घालवतांना दिसत आहेत. 2016 मध्ये करिश्मा-संजय यांचा घटस्फोट झाला होता.

2016 मध्ये घटस्फोट

2016 मध्ये मुंबईतील फॅमिली कोर्टने करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाला परवानगी दिली. घटस्फोटानंतर संजयने 10 कोटी पोटगी म्हणून दिले आहेत तर करिश्माला एक डुप्लेक्स दिलं गेलं आहे. संजय आपल्या मुलांच्या शिक्षणाचा देखील खर्च उचलत आहे.

2012 पासून वेगळे

करिश्माने 29 सप्टेंबर 2003 मध्ये बिझनेसमॅन संजय कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. हा करिश्माचा पहिला आणि संजयचा दुसरा विवाह होता. 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. करिश्मा आई बबिता यांच्यासोबत मुंबईत राहत होती.

संजय कपूरचं तिसरं लग्न

संजय यांनी एप्रिल 2017 मध्ये प्रिया सचदेव हिच्याशी कोर्ट मॅरेज केलं. दोघेही 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. संजय यांचा हा तिसरा विवाह आहे. संजय कपूर यांची पहिली पत्नी डिझायनर नंदिता महतानी आहे.