रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

सध्या रणबीर कपूर आलिया भट्टच्या प्रेग्नंन्सीमुळे बराच चर्चेत आहे.

Updated: Oct 13, 2022, 08:53 PM IST
रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान title=

Ranbir Kapoor and Shah Rukh Khan: बॉलीवूडमध्ये मैत्री ही अनेकदा पाहायला मिळते. अभिनेते आणि अभिनेत्री मैत्रीसाठी अनेकदा त्याग करतानाही दिसतात (Bollywood Actors Friendship). कधी आर्थिक मदत तर कधी चित्रपटासाठी मदत करताना आपण कलाकारांना पोहतो. अशाच एका कलाकाराला मदत करणं महागात पडलं आहे. (ranbir kapoor gave title to shah rukh khans films but got flop later)

हा अभिनेता आहे रणबीर कपूर (Ranbir Kapoor). सध्या रणबीर कपूर आलिया भट्टच्या प्रेग्नंन्सीमुळे (Alia Bhatt Pregnancy) बराच चर्चेत आहे. परंतु एकदा शाहरूख खानच्या चित्रपटासाठी रणबीरनं त्याला मदत केली होती पंरतु ही मदत करणं त्याला महागात ठरलं. ज्यासाठी शाहरूथ खान (Shah Rukh Khan) पाच हजार रूपयेही रणबीरला द्यावे लागले होते. 

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

2017 मध्ये आलेला 'जब हॅरी मेट सेजल' (Jab Harry Mret Sejal) हा शाहरुख खान आणि अनुष्का शर्माचा (Anushaka Sharma) चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. ऐंशी कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरून केवळ चौसष्ट कोटी रुपये कमावले. इम्तियाज अली (Imtiyaz Ali) यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख-अनुष्कासोबतच चंदन रॉय सन्याल, एव्हलिन शर्मा आणि आरुष वर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

या चित्रपटातून शाहरुख-अनुष्काची जोडी तिसऱ्यांदा पडद्यावर आली. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन या सर्व गोष्टींवर टीका झाली होती. 

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

एके दिवशी सकाळी रणबीर कपूरनं शाहरुखला फोन करून चित्रपटासाठी 'जब हॅरी मेट सेजल' असं नाव सुचवलं. वास्तविक, चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल बराच गोंधळ होता. यापूर्वी या चित्रपटाचे शीर्षक 'द रिंग' असे ठेवण्यात आलं होतं. पण जेव्हा रणबीर कपूरने 'हॅरी मेट सेजल' असं नावं सुचवलं तेव्हा सर्वांना ते नावं खूप आवडलं आणि तेच शीर्षक चित्रपटासाठी निवडलं गेलं ज्यासाठी शाहरूखनं रणबीरला पाच हजार रूपये दिले होते अशी माहिती कळते. चित्रपटाचे शीर्षक 1989 च्या हॉलिवूड चित्रपट 'व्हेन हॅरी मेट सॅली'पासून प्रेरित होते.

या चित्रपटाचे शीर्षक जरी रणबीरने सुचवले होते. मात्र शाहरुखच्या आधी त्याला या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. इम्तियाज अली बऱ्याच दिवसांपासून शाहरुख खानला आपल्या चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत होते. पण ते शक्य झाले नाही. परंतु रणबीरनं इतकं करूनही चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर चालला नाही.