खरंच Ranbir Kapoor विग लावतो? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल हाच प्रश्न?

तुमच्या समोर येणारा रणबीर दिसतो तरी कसा? पाहा व्हायरल व्हिडीओ  

Updated: Jun 6, 2022, 09:25 AM IST
खरंच Ranbir Kapoor विग लावतो? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल हाच प्रश्न? title=

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) च्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर तगडी फॉलोइंग असलेल्या रणबीरची स्टाईल अनेक चाहते कॉपी करतात. रणबीरच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. आता देखील रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणबीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकताचं रणबीरला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. व्हिडीओमध्ये रणबीर काळ्या रंगाच्या टि-शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे. हवेत उडणारे अभिनेत्याचे केस पासून अनेकांनी रणबीरला तू विग लवलं आहेस का? असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्यामुळे रणबीर खरंच विग लवलं आहे की  नाही? हे रहस्य रणबीर सांगेल तेव्हाचं कळेल. सध्या रणबीरच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याचे अनेक सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. 

रणबीर लवकरच 'अ‍ॅनिमल' सिनेमात दिसणार आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो यशराज बॅनरच्या 'शमशेरा' सिनेमातही दिसणार आहे. सिनेमात त्याची जोडी वाणी कपूरसोबत दिसणार आहे, सिनेमात संजय दत्तही दिसणार आहे. 

एवढंच नाही तर, रणबीर कपूरचा लव रंजनसोबत सिनेमा आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर असेल. सिनेमाचं शूटिंग सुरू झाले आहे, मात्र सिनेमाचं नाव अद्याप ठरलेले नाही.