मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्याच्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. यादरम्यान रणबीर कपूरने आलिया भट्टबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रणबीर कपूरने सांगितलं आहे की, आई झाल्यानंतर आलियाचं फिल्मी करिअर कसं असेल.
रणबीर कपूरने आलियाच्या करिअरबद्दल सांगितली एक मोठी गोष्ट
नुकतीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने आई बनणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. अशा परिस्थितीत शमशेराच्या प्रमोशन अंतर्गत एका मीडिया इंटरव्ह्यूमध्ये रणबीर कपूरने आलिया भट्टच्या करिअरबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. रणबीर कपूर म्हणाला की, "मी आणि आलिया भट्ट आमच्या मुलांबद्दल खूप आनंदी आहोत.
लग्नाआधीपासूनच आम्ही मुलाचं नियोजन सुरू केलं होतं. अशा परिस्थितीत आई झाल्यानंतर आलिया भट्टच्या अभिनय कारकिर्दीचाही विचार करण्यात आला आहे. आलियाने तिची स्वप्ने सोडावीत किंवा तिचं फिल्मी करिअर थांबवावं असं मला वाटत नाही. अशा स्थितीत तिने सर्व काही संतुलित करून चालावं. ज्यासाठी मी सदैव तिच्या पाठीशी उभा असेन.
शमशेरा कधी रिलीज होणार?
दुसरीकडे, रणबीर कपूरच्या आगामी 'शमशेरा' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट या महिन्यात 22 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. शमशेरा या चित्रपटाद्वारे रणबीर कपूर तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. दरम्यान, शमशेराचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.