मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहेत. दीपिकाने आपल्या वाढदिवसालाच रणबीरसोबत साखरपुडा केल्याचे वाऱ्यासारखे पसरले. मालदीपवरुन दोघेही सुट्टी एन्जोय करुन परतले तेव्हा समजल की यांच्यात लग्न झालं नाहीए.
नव्या वृत्तानुसार, लग्नासाठी दोन्ही घरांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. 'स्पॉटबॉय' ने दिलेल्या वृत्तानुसार रणबीरच्या पालकांनी दिपिकाच्या बर्थडेला तिला महागडा डायमंड सेट आणि सब्यसाची साडी भेट दिली.
हे गिफ्ट घेऊन दीपिका खूप खुश झालेली दिसत होती. रणबीरच्या घरातील मंडळींना दिपिका खूप पसंत आहे.
दिपिकाच्या घरातूनही रणबीरला पसंती आहे. दोघांच्या घरातून तर लग्नासाठी नकार नाहीए.
पण हे दोघे कधी निर्णय घेणार ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.