राणीच्या हिचकी सिनेमाने ५ दिवसात केली इतकी कमाई !

४ वर्षांनंतर सिनेसृष्टीत परतलेली अभिनेत्री राणी मुखर्जीचा कमबॅक जबरदस्‍त ठरला.

Updated: Mar 29, 2018, 10:49 AM IST
राणीच्या हिचकी सिनेमाने ५ दिवसात केली इतकी कमाई !

मुंबई : ४ वर्षांनंतर सिनेसृष्टीत परतलेली अभिनेत्री राणी मुखर्जीचा कमबॅक जबरदस्‍त ठरला. राणीच्या हिचकी या सिनेमाने ५ दिवसात चांगलीच कमाई केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुमारे २० कोटींची कमाई केली. राणीने मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. दोन वर्षांपूर्वी तिच्या मर्दानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. त्यानंतर हिचकी या सिनेमातून तिने पुर्नरागमन केले. 

इतकी केली कमाई

हा सिनेमा देशभरात ९६१ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने ३.३० कोटींची कमाई केली. ट्रेड एनालिस्‍ट तरण आदर्शने ट्वीट करुन सिनेमाची पाच दिवसांची कमाई जाहिर केली. यात सिनेमाची एकूण कमाई २०.१० कोटी असल्याचे कळत आहे.

निर्माते म्हणाले...

सिनेमाचे निर्माते मनिष शर्मा यांनी सांगितले की, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी याचा खर्च वसूल झाला होता आणि सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहुन मी आनंदीत आहे. पुढे ते म्हणाले की, अशाप्रकारच्या विषयांवर सिनेमे बनवायला हवेत आणि सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता अशाप्रकारच्या विषयांवर निर्मात्यांनी काम करायला सुरुवात केली आहे.

जबरदस्त प्रमोशन

या सिनेमात राणीने शालेय शिक्षिकेची भूमिका केली आहे. यात ती नैना माथुर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ज्यात तिला टॉरेट सिंड्रोम नावाचा आजार असतो. यामुळे तिला सतत उचकी लागत असते आणि हा आजार तिच्या करिअरमध्ये अडथळा बनतो. त्यावर मात करत ती कशी यशस्वी होते, अशी ही कथा आहे. रानीने सिनेमाचे वेगळ्या पद्धतीने जबरदस्त प्रमोशन केले होते.