आधी सर्वांसमोर चापट खालला, आता कंगनाविरोधातच होणार FIR? SGPC नं केली मागणी

Kangana Ranaut Slap Incident SGPC Demands FIR : कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याच्या प्रकरणात आता SGPC नं केली मागणी

दिक्षा पाटील | Updated: Jul 6, 2024, 01:49 PM IST
आधी सर्वांसमोर चापट खालला, आता कंगनाविरोधातच होणार FIR? SGPC नं केली मागणी title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut Slap Incident SGPC Demands FIR : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतनं हिमाचलच्या मंडीतून लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर जेव्हा कंगना ही चंडीगढ विमानतळावर पोहचली तेव्हा तिच्यासोबत असं काही झालं ज्याची बरेच दिवस चर्चा रंगली होती. खरंतर, एक सीआयएसएफ महिला जवाननं कंगना रणौतच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्या महिला जवानला निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आता तिच महिला जवान ही कंगना विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहे.

खरंतर शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीची बैठक झाली. त्यावेळी कंगना रणौतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. एसजीपीसीजे मुख्य अधिवक्ता हरजिंदर सिंग धामी यांनी सांगितलं की कंगनाला कानशिलात लगावण्याच्या प्रकरणात सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरचं ट्रान्सफर करण्यात आलं आहे. पण अभिनेत्री विरोधात कोणत्याही प्रकारचे कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की कंगनानं जे पंजाबी किंवा शेतकऱ्यांविरोधात द्वेश पसरवण्याचं काम केलं आहे. ज्याच्यानंतर पंजाब सरकारला कंगना विरोधात तक्रार दाखल करायची आहे. 

महिला जवानची बंगळुरुला बदली

कंगनाला कानशिलात लगावणारी महिला सीआयएसएफ ऑफिसरला बंगळुरुला ट्रान्सफर करण्यात आलं आहे. हे ट्रान्सर CISF च्या रिजर्व बटॅलियनमध्ये करण्यात आलं आहे.  खरंतर, न्यूज एजंसी एएनआयच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की महिला जवान अजून निलंबीत राहिल आणि तिच्या विरोधात एक विभागीय तपासणी ही सुरु आहे. 

हेही वाचा : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...

दरम्यान, 2021 मध्ये शेतकरी आंदोलन जेव्हा सुरु होतं तेव्हा कंगना रणौतनं म्हटलं होतं की आंदोलनात सहभागी असलेल्या महिला या फक्त 100-100 रुपये घेऊन बसल्या आहेत. याच आंदोलनात तिची आई देखील सहभागी होती आणि त्याचमुळे तिनं कंगनाला कानशिलात लगावली. कुलविंदरचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. या व्हिडीओत ती बोलते की कंगनानं म्हटलं होतं की 100-100 रुपये घेऊन महिला त्या आंदोलनाला बसल्या होत्या, काय ही बसेल. माझी आई बसली होती त्या आंदोलनात. 

कंगना रणौतचा आगामी चित्रपट

कंगना रणौतच्या कामा विषयी बोलायचे झाले तर तर ती लवकरच तिचा बहुप्रतिक्षित एमरजंसी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रणौतनं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. त्याशिवाय चित्रपटाता अनुपम खेर, श्रेयस तलपडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 6 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.