मुंबई : सध्या सोशल मीडियावर 'काच्चा बदाम' या बंगाली गाण्याचा बोलबाला आहे. हे गाणं सोशल मीडियावर खूप गाजत आहे. या गाण्यावर डान्स करताना अनेक सेलेब्स आणि लोकांनी त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. 'कच्चा बदाम' हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेत्या भुबन बद्यकरने गायलं आहे. जे खूप पसंत केलं जात आहे. आता हे गाणं रानू मंडलने तिच्याच स्टाईलमध्ये गायलं आहे. ज्यामुळे लोकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलंय. राणूचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती 'कच्छा बदाम' गाताना दिसत आहे.
लोकांनी उडवली रानू मंडलची खिल्ली
राणू मंडल हे गाणं गाऊन पुन्हा एकदा चर्चेत आलीये. तिला प्रचंड ट्रोलही केलं जात आहे. हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी तिची खिल्ली उडवली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलंय की, ओम शांती बदाम. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं, हे काय आहे? याचबरोबर अजून युजर्सने कच्चे बदाम कच्चे नसतात, बदनाम असतात. तर आणखी एका युजरनं लिहिलं की, हिमेश रेशमिया पुन्हा ही चूक करणार नाही. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत लोकं रानू मंडलला ट्रोल करतायेत.
व्हिडिओ व्हायरल
याशिवाय युजर्सनी रानू मंडलच्या व्हिडिओवर लाफ्टर इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पण सर्वाधिक कमेंट्स रानूला ट्रोल करणाऱ्या आहेत. याआधी रानू मंडलने सहदेव दर्डाचे 'बचपन का प्यार' हे गाणं गायलं होतं. त्यावेळीही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.