महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपचे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra next CM:  विधानसभेचा निकाल हाती आल्यनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिघांनी विजयासाठी जनतेचे आभार मानले. 

Updated: Nov 23, 2024, 11:11 PM IST
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपचे देवेंद्र फडणवीस  काय म्हणाले? title=

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. महायुतीत भाजपच  सर्वात मोठा पक्ष ठरल्यान महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण?असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

हे देखील वाचा... शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार?

महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी बहुमत मिळालं. महायुतीच्या महाविजयानंतर एक प्रश्नाचं अजून उत्तर मिळालेलं नाही. महायुतीच्या नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. सव्वाशेच्या घरात आमदार निवडून आलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरु झाली. फडणवीसांनी मात्र या प्रश्नावर खुबीनं उत्तर देणं टाळलंय.

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही

अमृता फडणवीसांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत न बोलता सरकार पुन्हा सत्तेत आल्याचा आनंद व्यक्त केला गेला. खासदार श्रीकांत शिंदेंनी मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत काही वाद नसून त्याबाबत काही गोष्टी ठरल्याचं सांगितलंय. नोव्हेंबरपर्यंत सरकार सत्तेवर येईल त्यामुळं पुढच्या काही तासांतच मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. तरीही महायुतीच्या मुख्यमंत्रिपदावर नेते मात्र उघड उघड बोलायला तयार नाहीत.

विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाकडून सर्वांधिकार देण्यात आले आहेत. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर पदाधिकारी निवडण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय, शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर, शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक, मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात हा निर्णय एकमतानं घेण्यात आला.