घाघरा, हाय हिल्ससोबत रणवीर सिंहचा डान्स

पाहा याचे खास क्षण 

घाघरा, हाय हिल्ससोबत रणवीर सिंहचा डान्स  title=

मुंबई : रणवीर सिंहचा घाघरा स्टाइल आता स्टाइल स्टेटमेंट बनलं आहे. मात्र आता हद्दच झाली रणवीर सिंहने आपल्या 'सिंबा'च्या प्रमोशनकरता चक्क घाघरा घातला आहे. रणवीर सिंहने पर्पल रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

'सा रे गा मा'च्या मंचावर रणवीर सिंहने आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन केलं. या सिनेमात सारा अली खान आणि रणवीर सिंह एकत्र दिसणार आहेत. या प्रमोशनच्या वेळी सारा आणि रणवीर एकत्रच होते.

हाय हिलवर केला डान्स 

रणवीरने घाघरा घालणं आता हे त्याच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. पण आता हद्दच झाली रणवीर सिंह या कार्यक्रमात चक्क हाय हिल घालून आला. यावेळी सगळ्यांच लक्ष हे रणवीरकडेच होतं. 

मात्र रणवीरने या हाय हिल्सवर डान्स करायला सुरूवात केली. तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्याकडे खिळल्या. कुणीही विचारही केला नव्हता की, एक मुलगा एवढ्या हाय हिल घालून डान्स करेल. 

'आंख मारे वो लडका, आंख मारे' या गाण्यावर सारा आणि रणवीरने डान्स केला. घाघरा आणि हाय हिल्समध्ये असलेला रणवीरचा अंदाज खूपच छान होता.  रणवीरने आपल्या डान्सने सगळ्यांनाच घायाळ केलं. 

फक्त घाघरा घालूनच रणवीर थांबला नाही तर त्याने डोक्याला दुपट्टा बांधला. अगदी देसी अंदाजात डान्स करताना रणवीर दिसला. निळ्या रंगाचा दुपट्टा त्याने आपल्या डोक्याला बांधला होता. 

28 डिसेंबर रोजी सारा आणि रणवीरचं 'सिंबा' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यावर्षीचा हा शेवटचा सिनेमा असेल. सारा अली खानचा हा एकाच महिन्यातील दुसरा सिनेमा आहे. 'केदारनाथ' या सिनेमातून साराने डेब्यू केला असून या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली आहे.