मुंबईः अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमुळे नेहमी स्पॉट केलं जातं. अलीकडेच रणवीर डीआयडीच्या सेटवर पोहोचले होता. तिथं रणवीरनं चक्क अभिनेत्रीसोबत फ्लर्ट केलं.
रणवीर सिंग बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये रणवीरनं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. त्याचं अभिनय कौशल्य अतुलनीय आहे हे सांगण्याची गरज नाही. '83' नंतर रणवीर आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'जयेशभाई जोरदार' आणि 'सर्कस'मध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या रणवीर 13 मे रोजी रिलीज होणाऱ्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
रणवीर सिंग अलीकडेच त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डीआयडी लिटिल मास्टर्समध्ये दिसला. त्याने मौनी रॉयसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिलं आहे 'ग्लोबल वॉर्मिंगचे खरे कारण @imouniroy. व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतोय 'मौनी जी, देशात उष्णतेची लाट आहे, काहीतरी करा', 'असो, इथे जर खूप गरम झालं असेल तर मी तयारीसह आलो आहे' आणि रणवीर अग्निशामक उपकरण उचलतो.
डीआयडीच्या सेटवर रणवीर सिंगने त्याची नेहमीची शैली कायम ठेवत एक रंगीबेरंगी शर्ट घातला, जो खूपच विचित्र दिसत होता. सूत्रांच्या माहितीनुसार या शर्टची किंमत जवळपास 90 हजार रुपये आहे. मौनीच्या लूकबद्दल बोलायचं तर तिने काळ्या आणि सिल्व्हर कलरचा लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती.