मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचं हे फोटोशूट पाहून सगळेच थक्क झाले. पण आता या अभिनेत्याला न्यूड फोटोशूट करणं महागात पडत आहे. काही काळापूर्वी मुंबईत फोटोशूट केल्याप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होती. इतकंच नाही तर इंदूरमध्ये रणवीरच्या विरोधात मोर्चा काढून त्याच्या फोटोशूटला मानसिक दिवाळखोरी म्हटलं होतं.
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट होऊन काही दिवस उलटले आहेत, मात्र या फोटोंवरील निषेध आणि प्रतिक्रिया अजूनही सुरूच आहेत. अलीकडेच आलिया भट्ट आणि विद्या बालनने रणवीर सिंगच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी आता आणखी एक अभिनेत्री रणवीर सिंगच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आपलं मत मांडलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, हे अभिनेत्याचे स्वातंत्र्य आहे, यासाठी तिला शिक्षा होऊ नये.
Delhi I think it’s artistic freedom and I don’t think anyone should be penalised for their artistic freedom: Actor Janhvi Kapoor when asked about Ranveer Singh's nude photoshoot controversy pic.twitter.com/2AN6pYUOvY
नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या जान्हवीला जेव्हा रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, "मला वाटतं हे कलात्मक स्वातंत्र्य आहे आणि मला वाटत नाही की तिच्या कलात्मक स्वातंत्र्यासाठी कोणालाही शिक्षा मिळावी." जान्हवीच हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.