रणवीर सिंह लवकरच होणार बाबा? मात्र वडिलांपासून लपवतोय का?

बॉलिवूडचं सुपरहिट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. आता यावेळी ते चर्चेत आले आहेत होणाऱ्या बाळामुळे.

Updated: Apr 23, 2022, 02:20 PM IST
रणवीर सिंह लवकरच होणार बाबा? मात्र वडिलांपासून लपवतोय का? title=

मुंबईः बॉलिवूडचं सुपरहिट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. आता यावेळी ते चर्चेत आले आहेत होणाऱ्या बाळामुळे. 

जरा थांबा. आम्ही बोलतोय रणबीरच्या आगामी चित्रपटाबद्दल. रणवीरचा आगामी सिनेमा 'जयेशभाई जोरदार'चा दमदार ट्रेलर आज रिलीज झाला. कॉमेडीसह सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजला रणवीरला त्याच्या खासगी आयुष्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. रणवीरला खासगी आयुष्यात मुलगा हवाय की मुलगी यावर रणवीरने दिलेलं उत्तर सर्वांनाच खूप आवडलं. 

त्याच्या सिनेमात एक डायलॉग आहे मुलगा असो किंवा मुलगी, देव जे देईल त्याचा आनंदाने स्वीकार करेल, मंदिरात प्रसाद म्हणून शिरा मिळो किंवा लाडू आपण तक्रार करतो का? असं उत्तर रणवीरनं दिलंय. 

रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडचं हॉट कपल आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी इटलीत लग्न केलं. या सिनेमाच्या ट्रेलरच्या रिलीजनंतर त्यांचे चाहते त्यांना त्यांच्या बेबी प्लानिंगबाबत प्रश्न विचारू लागले आहेत.