VIDEO : भिकारी फॅनसोबतचा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय वायरल

बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारा रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या लॉन्चिंगसाठी उत्सुक आहे. १ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Oct 25, 2017, 06:06 PM IST
VIDEO : भिकारी फॅनसोबतचा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय वायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारा रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या लॉन्चिंगसाठी उत्सुक आहे. १ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

सिनेमाच्या विविध कामांमध्ये व्यस्त असलेल्या रणवीरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत रणवीर आपल्या इतर फॅन्सप्रमाणे एका भिकारी महिलेसोबत हात मिळवताना दिसतोय. 

या व्हिडिओतून रणवीरचं आपल्या फॅन्सवरचं प्रेम दिसतंयच... शिवाय त्याच्यात माणुसकीही असल्याचं दिसतंय. रणवीर कधीही आपल्या फॅन्सना नाराज करताना दिसत नाही... हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक वेगळी जागाही तो निर्माण करू शकेल, हे नक्की. 

सोमवारी रणवीर मुंबईतील वांद्रे भागात दिसला. त्याला पाहताच त्याचे फॅन्स त्याच्या भोवती जमा झाले. प्रत्येकाला रणवीरसोबत सेल्फी घायचा होता... किंवा हात मिळवायचा होता. रणवीरनं कुणालाही निराश केलं नाही... यावेळीच रस्त्याच्या कडेला बसलेली एक अपंग भिकारी महिलाही या घोळक्यात सामील झाली... तिला पाहिल्यानंतर रणवीरनं खाली वाकून तिच्याशीही हस्तांदोलन केलं... रणवीरचा हा अंदाज त्याच्या फॅन्सना चांगलाच आवडलेला दिसतोय.