रणवीरकडून 'सुहागरात'चं गुपित उघड, 'सेक्स प्लेलिस्ट' शेअर करत म्हणाले...

आलियासमोर रणवीरने उघड केले लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचं गुपित उघड.... तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Jul 8, 2022, 09:53 AM IST
रणवीरकडून 'सुहागरात'चं गुपित उघड, 'सेक्स प्लेलिस्ट' शेअर करत म्हणाले...  title=

मुंबई : दिग्दर्शक करण जोहर सध्या 'कॉफी विथ करण' या शोचा 7व्या सीझनमुळे चर्चेत आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट पाहुणे म्हणून आले होते. करण जोहरचा 'कॉफी विथ करण' असा  शो आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी येतात. शोमध्ये कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. आता रणवीर आणि आलियाने त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल सांगितलं आहे. 

शोमध्ये रॅपिड फायरदरम्यान रणवीरने लग्नानंतर स्वतःच्या पहिल्या रात्रीबद्दल सांगितलं. रणवीर म्हणाला, 'माझ्या हनिमूनला मी खूप उत्साही होतो. माझ्याकडे सेक्स प्लेलिस्ट देखील आहे. त्यात काही सुफी आणि शास्त्रीय गाणी आहेत. रणवीर सिंगनेही यादीतील काही सूर गायले, जे ऐकल्यानंतर करण जोहर आणि आलिया भट्टला हसू आवरता आले नाही.

करणच्या या प्रश्नावर आलिया भट्ट म्हणाली की, 'मी तुम्हा सर्वांना सांगतो की हनीमून किंवा फर्स्ट नाईट असे काही नसतं. तुम्ही इतके थकलेले असता  की त्या वेळी तुम्हाला फक्त झोप प्रिय असते. यासोबतच आलिया भट्टनेही तिच्या लग्नाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले.

सध्या आलिया तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वा आलियाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लवकरचं आई आणि रणबीर बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर फक्त सेलिब्रिटींनीचं नाही, तर चाहत्यांनी देखील