Badshah: गुपचूप या अभिनेत्रीला डेट करतोय रॅपर बादशाह, दुसऱ्यांदा पडला प्रेमात

Badshah in Love again: बादशाह एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. पाहा कोण आहे ती अभिनेत्री?

Updated: Oct 12, 2022, 07:53 PM IST
Badshah: गुपचूप या अभिनेत्रीला डेट करतोय रॅपर बादशाह, दुसऱ्यांदा पडला प्रेमात title=
Badshah dating punjabi actress

मुंबई : भारतातील सर्वात प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर बादशाह (singer Badshah) गेल्या एक वर्षापासून एका अभिनेत्रीला डेट असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यांच्या गाण्याचे अनेक चाहते आहे. तो मात्र एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय. आपल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा बादशाह सध्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. (Badshah dating Punjabi actress Isha Rikhi)

बादशाह सुंदर पंजाबी अभिनेत्रीला (Punjabi actress) डेट करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या अभिनेत्रीचे नाव ईशा रिखी (Isha Rikhi) असे आहे.

बादशाह रिलेशनशिपमध्ये

बादशाह फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स' या वेब सीरीजमध्ये दिसला होता. या दरम्यान करण जौहरला (Karan Johar) आपण सिंगल असल्याचं त्याने सांगितलं होते. त्यानंतर बादशाह पंजाबी अभिनेत्रीला डेट करत असल्याचं पुढे आलं आहे. या दोघांची भेट एका मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सध्या ते एकमेकांना डेट करत आहेत.

पहिल्या पत्नीपासून वेगळा

बादशाह आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत अधिक काही बोलताना दिसत नाही. पण त्याने त्यांच्या या प्रेमाबद्दल घरी देखील सांगितले असून घरचे देखील या नात्यावर आनंदी असल्याचं बोललं जातंय. बादशाहचा आधीच विवाह झाला आहे. पण पत्नीसोबतच्या वादामुळे दोघेही वेगळे राहतात. बादशाह आणि त्याची पत्नी 2019 मध्ये वेगळे झाल्याचे बोलले जाते.

Badshah rumoured girlfriend Punjabi actress Isha Rikhi

बादशाहला पहिल्या पत्नीकडून एक मुलगी आहे. 2017 मध्ये जेसी ग्रेस मसीह सिंह जन्म झाला. कोरोनानंतर जास्मीन मुलीसोबत लंडनला निघून गेली.