मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व गाजवल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. आपल्या सौदर्याच्या जोरावर रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली आता ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिने आपल्या मानधनात वाढ केली आहे.
पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन स्वीकारणार असल्याचं समोर येत आहे. रश्मिकाचा 'मिशन मजनू' चित्रपटाच्या माध्यमातून ती लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील झळकणार आहे.
याशिवाय रश्मिकाने विकास बहल यांचा 'डेडली' हा आगामी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात ती बिग बींसोबत झळकणार आहे. चित्रपटासाठी रश्मिकाने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
'डेडली' चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र विकास बहल यांच्या रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पण विकास बहल यांनी चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.