'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदानाचा मोठा निर्णय

रश्मिकाचा तिच्या भविष्यासाठी लाभदायक ठरेल?  

Updated: Jan 11, 2022, 02:16 PM IST
 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदानाचा मोठा निर्णय title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार अर्जुन अल्लू आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने सर्व रेकोर्ड मोडले आहे. प्रदर्शनानंतर काही दिवसांत चित्रपटाने चांगलीचं मजल मारली आहे. रूपेरी पडद्यानंतर आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरचं हिंदी भाषेत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

पुष्पा चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने या चित्रपटाच्या सिक्वलसाठी फी वाढवल्याचं समोर येत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता निर्माते आणि दिग्दर्शक पार्ट 2 च्या तयारीला लागल्याचं कळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी 2 कोटी रुपये घेतले होते, मात्र आता रश्मिकाने पुष्पाच्या दुसऱ्या भागासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

अल्लू तेलगू सिनेमातील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जुन अल्लूने 'पुष्पा: द राइज' चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.