मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात कलाकारांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. आता देखील एका 23 वर्षीय अभिनेत्री गळफास घेत स्वतःचं जीवन संपवल आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर कलाविश्वात एकचं खळबळ माजली आहे. प्रसिद्ध ओरिया टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मिरेखा ओझाचं निधन झालं. भुवनेश्वर येथील भाड्याच्या घरात अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
रश्मिरेखा नयापल्ली परिसरात राहायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 वर्षीय रश्मिरेखाच्या वडिलांनी मुलीचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रावर संशय व्यक्त केला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती संतोषनेच दिल्याचे अभिनेत्रीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
ही घटना 18 जून रोजी रात्री घडली. शनिवारी वडिलांनी रश्मीला अनेक फोन केले. पण अभिनेत्रीने फोन उचलला नाही. त्यानंतर काही वेळाने संतोषने वडिलांना फोन करून रश्मिरेखाचं निधन झाल्याचे सांगितले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर संतोष आणि रश्मिरेखा घरात पती-पत्नी म्हणून राहत असल्याची माहिती घरमालकाने दिली. रश्मिरेखाच्या लिव्हा इन रिलेशनबद्दल वडिलांना माहित नसल्याचं समोर येत आहे.
दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रश्मिरेखाने एक सुसाइड नोट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. सध्या अभिनेत्रच्या आत्महत्येमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.