'त्यांना शरम नाही, त्यात मी काय म्हणू?'; अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींशी रोमान्स करणाऱ्या कलाकारांवर रत्ना पाठक संतापल्या

Ratna Pathak Slams Actors : रत्ना पाठक यांनी जे कलाकार त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करतात त्यांच्यावर टीका केली आहे. ही लाजिरवानी गोष्ट आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 13, 2023, 12:25 PM IST
'त्यांना शरम नाही, त्यात मी काय म्हणू?'; अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींशी रोमान्स करणाऱ्या कलाकारांवर रत्ना पाठक संतापल्या title=
(Photo Credit : Social Media)

Ratna Pathak Slams Actors : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या त्यांच्या 'धक-धक' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रत्ना पाठक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत कलाकारांवर अशी कमेंट केली आहे की जे नक्कीच सगळ्यांना अभिनेत्यांच्या मनाला लागेल. यावेळी रत्ना पाठक यांनी कोणत्याही अभिनेत्यांची नावं न घेता त्यांच्या वयाच्या अर्धा वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रत्ना पाठक यांनी म्हटलं की ही लाजिरवानी गोष्ट आहे की अभिनेत्यांना त्यांच्या मुलीपेक्षा वयानं लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स करण्यास लाज वाटत नाही. 

रत्ना पाठक यांनी 'इंडियाटुडे कॉन्क्लेव' दरम्यान, बॉलिवूडच्या अभिनेता आणि अभिनेत्रीमधील वयाच्या दरीचा मुद्दा या मुलाखतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. यावेळी रत्ना पाठक म्हणाल्या की 'जर त्यांना लाज वाटत नाही तर मी काय म्हणू? त्यांना त्यांच्या मुलीच्या वयापेक्षा कमी वय असलेल्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करण्यात लाज वाटत नाही, त्यामुळे माझ्याकडे याविषयी बोलायला काही नाही. माझं म्हणणं आहे की ही लाजिरवानी गोष्ट आहे.' 

सलमान खान ते शाहरुख खान या कलाकारांनी केलंय अर्धा वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स

बॉलिवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि आमिर खान असे कलाकार आहेत. जे चित्रपटात त्यांच्या वयाच्या अर्धा वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसतात. दरम्यान, या मुलाखतीत रत्ना पाठक यांनी कोणत्याही कलाकाराचं नाव घेतलं नाही. पण त्यांच्या वक्तव्यावरून त्यांचं हे वक्तव्य हे याच कलाकारांना धरून असल्याचं म्हटलं जातं आहे. 

लवकरच चित्रपटसृष्टीत होणार बदल

रत्ना पाठक यांचं असं मत आहे की लवकरच चित्रपटसृष्टीत बदल होणार आहे आणि महिला या क्षेत्राला लिड करतील. त्यावर बोलताना रत्ना पाठक म्हणाल्या की बदल होणार, मला याची कल्पना आहे, महिला आता बुर्का किंवा पधराच्या मागे राहत नाही. आज आम्ही आर्थिक दृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहेत. आम्ही काही गोष्टी पुढे घेऊन जाऊ, महिला स्वत: त्यांचा रस्ता बनवणार. यात वेळ जाणार पण नक्कीच त्यांची स्वत: ची ओळख एक ओळख निर्माण करतील. 

हेही वाचा : 'त्यांनी एक तरी चांगली भूमिका...,' रत्ना पाठक यांचं वहिदा रहमान यांच्याबद्दल मोठं विधान, 'पुरस्कार देण्यापेक्षा...'

रत्ना पाठक यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचा धक धक हा चित्रपट आज 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत फातिमा सना शेख, दीया मिर्झा आणि संजना सांघी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण डुडेजानं केले आहे.